नाशिक (Heart attack) : आज भारतात दर 33 सेकंदाला एक व्यक्ति हार्ट अटॅकमुळे आपले प्राण गमावतो आहे आणि यामध्ये बहुसंख्य रुग्ण हे ५० वर्षांच्या आतील असून अनेकांना हृदयरोगाची लक्षणे सुद्धा नसल्याचे दिसून आले आहे. हृदयरोगासाठी केल्या जाणाऱ्या तपासण्यासुद्धा नॉर्मल असल्याच्या आढळून आले आहे. अशा सर्व परिस्थितीमुळे आपण हृदयासंबंधीत होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून अनभिज्ञ आहोत. याच अनुषंगाने हृदयरोगाचा धोका अधिक अचूकपणे ओळखण्यासाठी माधवबाग तर्फे “हार्ट अटैक के डर से आज़ादी” या मोहिमे अंतर्गत एक लाख हृदयाचे ठोके मोजण्याची नवीन चाचणी विकसित करण्यात आली असल्याची माहिती माधवबागचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रोहित साने यांनी दिली. आणि या मोहिमेचा शुभारंभ नाशिक येथे करण्यात आला.
डॉ. रोहित साने पुढे म्हणाले की, साधारणतः एका व्यक्तीस दर मिनिटाला 72 ठोके म्हणजेच 24 तासात सुमारे एक लाख ठोके पडतात. सध्या प्रचलित चाचण्यांमध्ये या एक लाख ठोक्यांपैकी फक्त काहीच ठोक्यांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे अशा चाचण्यांचा निकाल नॉर्मल असूनदेखील बरेचदा (Heart attack) हृदयविकाराचा झटका येतो. याच अनुषंगाने हृदयाचा एकही ठोका न चुकवता 24 तासातील एक लाख ठोक्यांचे अचूक निदान करण्यासाठी माधवबाग तर्फे “हार्ट अटैक के डर से आज़ादी” या मोहिमे अंतर्गत एक उपकरण विकसित करण्यात आले आहे. हे उपकरण वायरलेस व अगदी लहान असून छातीवर हृदयाच्या बाजूस चिटकवले जाते. यामुळे प्रत्येक ठोक्यांचा व्यवस्थित अभ्यास करता येऊन व्यक्तीस हृदयविकाराचा कितपत धोका आहे हे सांगता येणे शक्य असल्याचे डॉ. रोहित साने यांनी नमूद केले.
हृदयविकाराचा (Heart attack) संभाव्य धोका ओळखण्यासाठी हे 24 तास मॉनिटरिंग मशीन एक वरदान आहे, प्रामुख्याने खालील व्यक्तींना हे मॉनिटरिंग करून घेणे आवश्यक आहे.
१) ज्यांना आधी हृदयाचा त्रास होऊन गेला आहे.
२) ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा स्थूलतेमुळे धाप लागत आहे, पायावर सूज आहे, छातीत सतत दुखत राहते. अशा सर्वांनी”हार्ट अटैक (Heart attack) के डर से आज़ादी”या मोहिमेत सहभागी होऊन ही 24 तास मॉनिटरिंग चाचणी करून घ्यावी असे आवाहन ही डॉ. रोहित साने यांनी केले आहे. ही चाचणी नाशिक शहरातील माधवबागच्या सर्व केंद्रात अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे.
माधवबागची वैशिष्ट्ये:
हृदयरोगावर कोणतीही शस्त्रक्रिया न करता रोगनिदान चाचण्याच्या आधुनिक पद्धती, आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि योग्य जीवनशैलीचा स्वीकार यांच्या साहाय्याने बरी करणारी भारतातली नव्हे तर जगातली एकमेव संस्था म्हणजेच माधवबाग…. मल्टीडिसिप्लिनरीकर्डीॲक क्लिनिक्स एन्ड हॉस्पिटल्स…..!
डॉ. रोहित माधव साने यांचा ऍलोपॅथी संदर्भात असलेला अभ्यास आणि वडिल वैद्य.माधव साने यांच्याकडून मिळालेला आयुर्वेदाचा वारसा या दोन्ही पॅथिंची डॉ. रोहित साने यांनी सांगड घातली आणि हृदयविकार, ब्लॉकेजेस,डायबेटीस, ब्लड प्रेशर, अति लठ्ठपणा आणि कोलेस्टेरॉलसारखे प्राणघातक आजार असलेल्या 10 लाखांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना जगण्याची नवी उम्मीद दिली आहे.
माधवबागच्या 20 वर्षातील अनुभवातून करण्यात आलेली उपचारांची संशोधने लॅन्सेट, युरोपियन सोसायटी ऑफ कार्डियॉलॉजी आणि इंडियन हार्ट जर्नल यांसारख्या 150 हुन अधिक जगभरातील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय नियतकालिकांनी स्वीकारली आहे. माधवबागची 360 हून अधिक क्लिनिक्स आणि 3 हॉस्पिटल्स देशभरातल्या 15 राज्यांमध्ये पसरली आहेत. डॉ. रोहित साने यांच्या मार्गदर्शनाखाली 450 हुन अधिक कुशल तज्ज्ञांची एक टीम लाखो लोकांना आधुनिक रोगनिदान चाचण्या, शास्त्रोक्त पद्धतीचा आहार, आरोग्याच्या निरंतर देखरेखीसाठी mibPulse app आणि पावर मॅप सारखे विकसित तंत्रज्ञान, रिसर्च बेस्ड औषधं व पंचकर्म चिकित्सा या पंचसूत्रीच्या सहाय्यानेआरोग्य सेवा पुरवते आहे.
“हृदयरोग मुक्त भारत (Heart disease) करणे हे माधवबागचे स्वप्न आहे. तुम्हीदेखील या मोहिमेविषयीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून “हृदयरोग मुक्त भारत हे माधवबागचे स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावू शकता . व स्वतः सोबत इतरांचेही हृदय निरोगी ठेवण्यास मदत करू शकता.