आरोग्याची काळजी घ्या- डॉ, विणकार मॅडम
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Heart attacks) : हिवाळा हा वर्षाचा एक सुंदर काळ असू शकतो – परंतु तो तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक असू शकतो. यावर्षी असे दिसून आले आहे की मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अती थंडीची लाट दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामध्ये अती थंडीच्या हूडहुडीमुळे वयोवृद्धाना हृदयविकाराच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रत्येक कुंटूंबानी आपल्या घरातील वयोवृद्धाच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन चिखली तालुका आरोग्य अधिकारी डॉ विणकार मॅडम यांनी केले आहे.
चिखली तालुका आरोग्य विभागा अंतर्गत तालुक्यात सात प्राथमिक आरोग्य केंद्र असून जनतेच्या सेवेसाठी आरोग्य विभागात रुग्णांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवक, सेविका तसेच कर्मचारी वृंद काम करतात. संद्या हिवाळ्याचे दिवस असल्याने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य तालुका आरोग्य अधिकारी विणकार मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली कुंटुंब (Heart attacks) शस्त्रक्रिया कॅम्प आयोजीत करण्यात आले होते . आतापर्यंत मुस्लिम, बौध्द, हिंदू, ख्रिचन, अशा ऐकून ५२ महिलांनी लाभ घेतला ,त्यातच अनेक कुंतुबात वयोवृद्ध महिला पुरुष व आजारी व्यक्ती आहे. अशा लोकांनाथंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढू शकतो आणि (Heart attacks) हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो .
सर्दी, खोकला असे आजारीचाही त्रास जाणावत असल्याने अचानक हृदयविकारा मुळे छातीत दुखू शकते आणि झटका येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा घरातील कुटूंबातील लोकांनी काळजी पूर्वक लक्ष देवून त्यांना घराबाहेर सकाळ संध्याकाळ जावू देऊ नये, मच्छरापासून दूर ठेवावे, घरातील साफ सफाई व पाणी स्वच्छ ठेवावे, घरात बसून व्यायाम करण्यास लावावे, थंडीच्या वेळेत अंगावर गरम कपडे द्यावे तसेच काही अडचण आल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क करावा असे डॉ विणकर मॅडम यांनी दै देशोन्नती शी सांगितले.