नवी दिल्ली (Heat Wave) : देशभरात उष्णतेची लाट (Heat Wave) कायम आहे. विशेषत: उत्तर भारताचा मोठा भाग उष्णतेच्या तडाख्यात आहे. या उष्णतेपासून मानव आणि देवही हैराण झाला आहेत. अनेक भागात तापमान 45 अंशांच्या पुढे गेले आहे. 21 मे रोजी हरियाणातील सिरसा हे 47.8.८ अंशांसह सर्वात उष्ण क्षेत्र होते. राजस्थानमधील पिलानी 47.2 अंशांवर आणि पंजाबमधील भटिंडा 46.66 अंशांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते.
परमेश्वराला उन्हापासून दिलासा देण्यासाठी…
दिल्लीतही तापमानात वाढ झाली आहे. भारतीय (Meteorology Department) हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये पुढील 5 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये परमेश्वरासाठी एसी-कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे. सामान्य दिवसात परमेश्वराने परिधान केलेल्या जड कपड्यांऐवजी सुती कपड्यांचा वापर केला जात आहे.
काशीच्या मंदिरात बसवले एसी-कूलर
वाराणसीमध्ये उन्हाळ्याची तीव्रता शिगेला पोहोचली आहे. परिसराचे तापमान 44 अंशांवर पोहोचले आहे. (Heat stroke) कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर वाराणसी मंदिर प्रशासनाने काशीच्या मंदिरांमध्ये एसी आणि कुलर लावले आहेत. यासोबतच परमेश्वराला उन्हापासून दिलासा देण्यासाठी सुती कपडेही परिधान करण्यात आले आहेत. लोहटिया, वाराणसीच्या (God Heat) राम जानकी मंदिराचे पुजारी सांगतात की, यावेळी कडक उष्णतेने सर्व जुने रेकॉर्ड मोडले आहेत. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी मंदिरात देवासाठी कुलरची व्यवस्था करावी लागल्याचे त्यांनी सांगितले. परमेश्वराला गरमी जाणवू नये म्हणून त्याला सुती कपडे घातले आहेत. यासोबतच हंगामी फळेही प्रसाद म्हणून दिली जात आहेत.
देवाला घातले सुती कपडे
याशिवाय वाराणसी येथील प्रसिद्ध बडा गणेश मंदिराचे पुजारी सांगतात की, अनियंत्रित (Heat stroke) उष्णतेमुळे सर्वजण हैराण झाले आहेत. त्यामुळे श्रीगणेशासाठी वातानुकूलित यंत्र (एसी) बसविण्यात आले आहे. उष्णतेमुळे देवाला त्रास होतो असे नाही, तरीही प्रतिकात्मकरीत्या हे दरवर्षी कडाक्याच्या उन्हात केले जाते, असेही ते म्हणाले. श्रीगणेशाला सुती वस्त्र परिधान केले जात आहे. हिवाळ्यातही विशेष व्यवस्था हे जवळजवळ दरवर्षी केले जाते. अतिउष्मा किंवा थंडीच्या वेळी ऋतूनुसार हिटर, कुलर, कपडे यांची व्यवस्था परमेश्वरासाठी (God Heat) केली जाते. तसेच ज्या प्रसादात परमेश्वराला नैवेद्य दिला जातो, त्या ठिकाणी हवामानाकडे विशेष लक्ष दिले जाते.