कोरेगाव/चोप (heat wave) : देसाईगंज तालुक्यातील उष्माघातामुळे (heatstroke) तिसरा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. तापमानात वाढ होत असल्याने, जनतेने (Health Department) आरोग्य विभागाकडुन मिळालेल्या माहितीचे पालन करण्याचे आवाहन, विभागाकडून करण्यात आले आहे.
येथे CLICK करा : दोन दिवसात उष्माघाताचे दोन बळी
देसाईगंज तालुक्यातील दामाजी मडावी हे चोप परीसरात वाजंत्री होते. ते वाजंत्रीच्या कामावरुन आले, आणि त्यांना अस्वथ वाटू लागले. उपचारासाठी रुग्णालयात (Gadchiroli Hospital) नेण्याआधीच त्यांचे निधन झाले. कोरेगाव येथील यशंवत वालदे हे मजुरी कामावरून आले असता, त्यांना अस्वस्थ वाटले. परंतु उपचारापुर्वीच त्यांचे पण निधन झाले. या (heatstroke) घटनेची माहिती मिळत नाही तोच, आज गोपिनाथ बाजिराव निमकर कोरेगाव, हे आपल्या शेतातील मका तोडुन वाळनीला टाकुन दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घरी आले. जेवनानंतर अस्वस्थ वाटल्याने त्यांना ब्रम्हपुरी येथे उपचारासाठी नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.