भंडारा (Bhandara):- उन्हाचा पारा प्रचंड वर पोहोचला असून लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत उन्हाचा त्रास होऊन लोक आजारी पडू लागले आहेत. अशातच या उष्म्यामुळे लाखांदूर येथील एका ५१ वर्षीय व्यक्तीचा जीव गेला. भास्कर तरारे असे उष्माघातामुळे जीव गेलेल्या व्यक्तीचे नाव असून भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या(General hospitals) अतिदक्षता विभागात उपचार सुरू गुरूवार दि.३० मे २०२४ रोजी त्यांचा मृत्यू झाला..
भंडार्यात उष्माघाताचे पाच रूग्ण दाखल
आकाशातुन सुर्य आग ओकत आहे. जिल्ह्यात तापमानाचा(temperature) पारा ४५ अंशावर पोहोचला असून अंगाची लाही लाही होत आहे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे ५ उष्माघाताचे रुग्ण दाखल असून त्यांचेवर उपचार सुरू आहे. लाखांदूर येथील भास्कर तरारे नामक ५१ वर्षीय व्यक्ती दि.२९ मे रोजी दाखल करण्यात आला होता. त्यांचा गुरुवार दि.३० मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. भंडार्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला. सध्या जिल्ह्यात उष्णतेची लाट(Heat wave) असून नागरिकांनी उन्हापासून स्वतःचा बचाव करावा. शक्यतो उन्हाबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच शरीरातील तापमान नियंत्रित राहील या दृष्टीने उपाययोजना कराव्यात असे आवाहन वैद्यकीय अधिकार्यांकडून केले जात आहे