गंगाखेड (Heat Wave) : उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे (Heat Wave) तापमानात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. याचा मोठा फटका पशु पक्षांना बसत आहे. उन्हाची वाढती तीव्रता पाहून पशु पक्ष्यांसाठी घराच्या छतावर, पत्रावर व अन्य ठिकाणी पाण्यासोबत दाणे व चारा ठेवण्याचे आवाहन सर्पमित्र चेतन लांडे यांनी केले आहे.
पशु पक्षांना दाणे, चारा व पाणी ठेवावे
निसर्गाविरुद्ध मनुष्याच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे पृथ्वी ग्लोबल वॉर्मिंगच्या दिशेने वाटचाल करत आहे. सद्य परिस्थितीत उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून बहुतांश ठिकाणी तापमानाने उच्चांक गाठला आहे. (Heat Wave) उष्णतेच्या या वाढत्या तीव्रतेचा फटका पशु पक्षांना बसत आहे. गेल्या आठवड्यात संपूर्ण भारत देशात (Heat stroke) उष्णतेची लाट निर्माण झाली होती. सध्या नदी, नाले कोरडे पडल्यामुळे व विहिरीचे पाणी ही कमी झाल्यामुळे व पिके सुद्धा सुकून जात असल्याने राना वनातील (bird lovers) पशु, पक्षी पाणी व चाऱ्याच्या शोधात मनुष्य वस्तीकडे धाव घेत आहे.
पक्षी प्रेमी यांचे आवाहन
काही जागरूक नागरिक पक्षांसाठी दाणे, चारा व पाण्याची सोय करत आहेत. अनेक ठिकाणी (Heat stroke) उष्माघाताने पशु पक्षी नष्ट होण्याची वेळ येत आहे. या पशु पक्षांना टिकवणे काळाची गरज असून पशु पक्षी नष्ठ झाले. याचा मनुष्य प्रजातीला सुद्धा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्व सुजाण नागरिकांनी आपल्या परिसरातील (bird lovers) पशु पक्षांचे संवर्धन करण्यासाठी घराच्या छतावर तसेच पत्रावर आणि ज्या ठिकाणी नेहमी पक्षी येतात. अशा ठिकाणी पशु पक्षांना दाणे, चारा व पाणी ठेवावे आणि निसर्ग संवर्धनाचा विडा उचलावा, असे आवाहन सर्पमित्र चेतन लांडे यांनी केले आहे.