पुसद (Heat Wave) : मे हिट त्यात अवकाळी पावसाचे थैमान अंगाची काहिली करणारे ऊन (Heat Wave) व अवकाळी पाऊस कोसळल्यामुळे प्रचंड होणारी गर्मी (Heat Wave) यापासून सुटका मिळविण्यासाठी येथील कॅनॉल मध्ये सुटलेल्या पाण्यामध्ये आंघोळीचा आनंद घेत असताना हे चिमुकले. मार्च, एप्रिल व मे मध्ये उन्हाचा तडाखा तालुक्यासह शहरात मोठ्या प्रमाणात जाणवत होता. तापमानाने 43 वी गाठली होती.
अशातच अवकाळी पाऊसही अधून-मधून वादळ वाऱ्यासह कोसळला. यामुळे काही अंशी गारवा व दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्मी त्यातच महावितरणचे अघोषित लोडशेडिंग असल्यामुळे, यामुळे सर्वसामान्यांसह शेतमजूर व्यापारी शेतकरी व कामगारांसह मुके प्राणी यामुळे त्रस्त झाले. तर कॅनॉल ला पाणी सुटल्यामुळे ग्रामीण भागासह शहरालगत असलेल्या परिसरातील चिमुकले (Heat Wave) गर्मीपासून सुटका मिळविण्यासाठी आंघोळीचा आनंद घेताना दिसत आहेत.