नांदेड (heat wave) : जिल्ह्यात तापमानाचा वरचेवर वाढत असून सूर्य आग ओकत (heat wave) असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवारी नांदेड जिल्ह्याचे तापमान तब्बल 43.2 अंश सेल्सियसवर पोहचले असून जिल्ह्यात या उन्हाळ्यातील हा तापमानाचा उच्चांक ठरला आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा हा उच्चांकी पातळी गाठत आहे.
रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष स्थापन
जिल्ह्यात एप्रिलच्या मध्यापासून तापमानाचा पारा (heat wave) चढताच राहिला आहे. वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे काही दिवस तापमानाचा पारा किंचित प्रमाणात घसरला होता. तापमान ३८ अंश सेल्सिअस ते ४०, ४१, ४२.८ अंश सेल्सिअसवरून तापमान ४३.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. तापमानाचा हा चढता पारा लक्षात घेता (Health Department) आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपायोजना हाती घेतल्या आहेत. (Nanded hospital) जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे स्वतंत्र उष्माघात (heat wave) कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. नागरिकांनाही उन्हापासून बचावाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.