नवी दिल्ली (Heat Wave) : कडाक्याच्या उन्हात तापमानाचा पारा (Climate temperatures) सातत्याने वाढत असून, त्यामुळे जनजीवन कठीण झाले आहे. राजधानीत पारा 45.4 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याचे (Meteorology) हवामान खात्याने सांगितले. जे सामान्यपेक्षा पाच अंश सेल्सिअस जास्त होते. कडाक्याच्या उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्ली-एनसीआरमधील लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. कडाक्याच्या उन्हापासून आणि (Heat Wave) उष्णतेच्या लाटेपासून लोक सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत.
तीन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी
येत्या काही दिवसांतही उन्हापासून दिलासा मिळणार नाही. पुढील तीन दिवस (Heatstroke) तीव्र उष्णतेचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. हवामान खात्याकडून पुढील तीन दिवस रेट अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीतील मंगेशपूर भागात पारा 48.3 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. तर नजफगडमध्ये पारा 48.1 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. एनसीआरमध्ये पारा सामान्यपेक्षा 8 अंश सेल्सिअसने जास्त नोंदवला गेला. बहुतांश भागात (Heat Wave) उष्णतेच्या लाटेमुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
उष्णतेची तीव्र लाट कायमच कहर करणार
दिल्ली आणि उत्तर भारतात 29 मेपर्यंत उष्णतेची तीव्र लाट (Heatstroke) कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दिल्लीशिवाय पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये भीषण (Heat Wave) उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
उष्णतेची लाट, काळजी घ्या
उत्तर प्रदेश, चंदीगड, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्लीसाठी रेड अलर्ट जारी करताना हवामान खात्याने या उन्हाळ्यात लोकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. 27 आणि 28 मे रोजी राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागात (Heat Wave) उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये पारा 50 च्या जवळ पोहोचला
राजस्थानच्या फलोदीमध्ये रविवारी पारा 49.8 अंश सेल्सिअसवर पोहोचला. येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये तापमानाचा पारा (Climate temperatures) जास्त राहणार असून रात्रीच्या वेळीही उष्मा राहील, असे (Meteorology) हवामान खात्याने म्हटले आहे.