नवी दिल्ली (heat wave) : सध्या संपूर्ण देशभरात (heat wave) उष्णतेच्या लाटेमुळे सर्वांनाच हैराण सोडले आहे. वाढत्या उष्णतेबाबत अनेक राज्ये आणि शहरांमध्ये हाय अलर्टह जारी केला आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे सरकारने अनेक राज्यांतील शाळांना सुटीही जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये (School vacation) उन्हाळ्याच्या सुट्या जाहीर केल्या आहेत.
जवळपास 30 दिवस शाळा बंद
वाढत्या उष्णतेमुळे (heat wave) उत्तर प्रदेशच्या शिक्षण विभागाने 20 मे 2024 पासून सुट्टी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये 18 जून 2024 पर्यंत शाळा बंद राहतील. उत्तर प्रदेशात फक्त सरकारी शाळा बंद आहेत. 20-25 मे 2024 पर्यंत खाजगी शाळांमध्ये (School vacation) सुटीही जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
राजधानीत सुटी जाहीर
राजधानीतही (heat wave) उष्णतेचा इशारा लक्षात घेता राज्य सरकारने सर्व सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांना सुटी जाहीर केली आहे. 11 मे ते 30 जून 2024 या कालावधीत दिल्लीतील सर्व शाळांमध्ये (Summer Vacation) उन्हाळ्याच्या सुट्या आहेत. दिल्लीतील खासगी शाळांमध्ये अद्याप सुटी जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरच ते (School vacation) सुटीही जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.
या राज्यांमध्येही शाळा बंद
वाढत्या उष्मा आणि (heat wave) उष्णतेच्या लाटेमुळे यूपी, बिहार, दिल्ली एनसीआर, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये एक महिन्याची सुट्टी (Summer Vacation) जाहीर करण्यात आली आहे. दरवर्षी सुटी मे महिन्यातच जाहीर केली जाते. यावेळी एप्रिल महिन्यापासूनच सूर्याने लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली होती.