Heavy rain:- रेमल चक्रीवादळाने(Hurricane) ईशान्येत कहर केला आहे. पश्चिम बंगालसह जवळपास सर्वच ईशान्येकडील राज्यांना मुसळधार पावसाचा (Heavy rain) फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे या राज्यांतील काही भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला. नदीच्या वाढत्या पाण्यामुळे रस्ते वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत (disturbed) होत आहे. मुसळधार पावसामुळे मणिपूरच्या (Manipur)इम्फाळ खोऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर हजारो बेपत्ता झाले.
मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय
मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यात भूस्खलनामुळे एका ३४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू (Death)झाला. त्याचवेळी या अपघातात अन्य तीन जण जखमी झाले आहेत. सेनापती नदीच्या पात्रात 83 वर्षीय वृद्ध महिलेचा बुडून मृत्यू झाला. इंफाळमध्ये बुधवारी एका ७४ वर्षीय व्यक्तीचा विजेचा धक्का(Electric shock) लागून मृत्यू झाला. इम्फाळ नदी दुथडी भरून वाहत असल्याने अनेक भाग पाण्याखाली गेले. नदीचे पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले. इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील 86 भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भागात खुमान लम्पक, नागराम, सगोलबंद, उरीपोक, कीसमथोंग आणि पाओना भागांचा समावेश आहे. संततधार पावसामुळे पूर्व इम्फाळ जिल्ह्यातील केरांग, खबाम आणि लारियांगबम लीकाई भागाजवळ इम्फाळ नदीचे पात्र तुटले, त्यामुळे या भागात पाणी शिरले. पूर्व इम्फाळ जिल्ह्यातील हिंगांग आणि खुरई भागातील अनेक भाग खराब झाले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अनेक भागात पुराचे पाणी छातीपर्यंत पोहोचले आहे.
एनडीआरएफची टीम बुधवारी दाखल
बचाव कार्यासाठी एनडीआरएफचे (NDRF)एक पथक बुधवारी रात्री १० वाजता हवाई दलाच्या (air force) विशेष विमानाने इम्फाळला पोहोचले. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह(Chief Minister N Biren Singh) म्हणाले, अनेक भागात नदीचे पात्र तुटल्याने अनेक लोक प्रभावित झाले आहेत. राज्य सरकारचे अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि एनडीआरएफची टीम लोकांना वाचवण्यासाठी सतत काम करत आहे. इम्फाळ आणि सिलचरला जोडणारा NH 37 वरील इरांग बेली पूल मंगळवारी संध्याकाळी मुसळधार पावसामुळे कोसळला आणि रस्ते दळणवळण विस्कळीत झाले.