भिवापूर (Bhiwapur Truck swept away) : उमरेड हिंगणघाट मार्गावरील चिखलापार गावाजवळ पुला वरून रविवारी सायंकाळच्या सुमारास वाहून गेलेला ट्रक आज घटनास्थळा पासून तीन किलोमीटर अंतरावर आढळला मात्र चालक व वाहकाचा अद्यापही शोध लागला नाही. एम एच/सीक्यू६४६४ क्रमांकाचा ट्रक रविवारी उमरडवून हिंगणघाट कडे जात होता. (Bhiwapur Truck swept away) यावेळी चालक संतोष पुंडलिक ढोणे वय 52 वर्ष राहणार हिंगणघाट व वाहक मनोज पोहणे व 35 वर्ष राहणार नांदगाव हे ट्रक मध्ये बसले होते चालकाने पुलावरून तीन चार फूट पाणी असताना ट्रक काढण्याचा प्रयत्न केल्याने ट्रक सोबत चालक वाहकही वाहून गेले.
येथे CLICK करा: मोठी घटना: नदीच्या पुलावरून अख्खा ट्रक गेला वाहून
काल रात्र झाल्याने प्रशासनाने आज शोधकार्य सुरू केले ट्रक घटनास्थळापासून तीन किलोमीटर अंतरावर रेती मध्ये फसलेला आढळला. मात्र केबिनमध्ये शोध घेतला असता चालक व वाहकाचा शोध लागला नाही. (Bhiwapur Truck swept away) ट्रकला दोन जेसीबीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करूनही रेती मध्ये फसल्याने यश आले नाही. रात्र झाल्याने आजची शोध मोहीम थांबवण्यात आली असून उद्या सकाळी पुन्हा शोध कार्य राबवणार असल्याची माहिती भिवापूरचे तहसीलदार कल्याण कुमार डहाट यांनी दिली