पहिल्याच पावसात राष्ट्रीय महामार्गांवरील सुरक्षा भिंत कोसळली
बारव्हा (Heavy Rain) : लाखांदूर ते अंतरगाव या राष्ट्रीय महामार्गवरील नाल्याजवळ बांधलेली सिमेंट काँग्रेटची सुरक्षाभिंत यंदा झालेल्या पहिल्याच (Heavy Rain) मुसळधार पावसाने कोसळली असून, मुख्य सिमेंट रस्त्यालगत लावलेले गट्टूही पूर्णत: जमीनदोस्त झाले आहे. (National Highway) राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३ या महामार्गाची सिमेंटीकरणं करताना सुरवातीपासूनच अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम करण्यात आले आहे.
लाखांदूर-अंतरगाव मार्गावरील घटना, कामावर प्रश्नचिन्ह
लाखांदूर ते अंतरगाव या (National Highway) महामार्गावरील नाल्यावर पुलाचे बांधकाम (bridge) करताना दोन्ही बाजूला जवळपास १० फूट उंचीचे सिमेंट काँक्रेटची सुरक्षा भिंत (Concrete safety wall) बांधण्यात आली. मात्र सुरक्षाभिंतीचे बांधकाम करताना नियमाची धज्जा उडवीत संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला आहे. त्यामुळे दि. ३ जुलै रोजी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) सुरक्षाभिंत कोसळून जमीनदोस्त झाली आहे. सोबतच सिमेंट रस्त्यालगत लावलेले गट्टूही जमीनदोस्त झाले असून रस्त्याला तडेही पडले आहे. जवळपास ७० फूट लांब सुरक्षा भिंत जमीनदोस्त झाल्याने या कामात किती भष्ट्राचार झाला, याचा ज्वलत पुरावा बघावयास मिळत आहे. संबंधित विभाग या बांधकामची चौकोशी करून कार्यवाही करणार का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून विचारल्या जात आहे. दरम्यान संबंधित बांधकामाची चौकशीकरून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष निकेश दिवठे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रकाश देशमुख, उपाध्यक्ष आशिष शहारे, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सुनील तोंडरे यांनी केली आहे.