अवकाळी पावसाचा तडाखा सुरूच
गडचिरोली (Heavy Rain) : परतीच्या पावसाने झोडपून काढल्यानंतर आता अवकाळी पावसानेही तडाखा देणे सुरू केले आहे. दरम्यान ८ ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असल्याने शेतकर्यांना आणखी ४ दिवस अवकाळी पावसाचा तडाखा सहन करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२९ सप्टेंबर पासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जो प्रामुख्याने मेघ गर्जनेसह राहील आणि दुपार नंतर पडेल. (Heavy Rain) वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता विदर्भात राहील. काढणी केलेली पिके पाऊस आणि वार्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. ७ ऑक्टोबर पासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल आणि सुमारे ८ ऑक्टोबर पासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान गेल्या दोन – तिन दिवसापासून येत असलेल्या अवकाळी पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. अनेक शेतकर्यांच्या शेतातील धान पिके शेतातच आडवी पडली आहेत. हे धान पिक पावसामुळे सडून जाण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे. अशातच धान पिकावर विविध कीडींचा प्रादुर्भाव झाला आहे. (Heavy Rain) गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत ११७ टक्के पाऊस पडला आहे. गडचिरोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.


