नवी दिल्ली (Heavy Rain) : देशाच्या अनेक भागांत उष्णतेची (Heat wave) स्थिती कायम असून, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. 30 मे नंतर उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात सुरू असलेल्या तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळण्याची आशा असल्याचे हवामान विभागाने (IMD) सांगितले आहे. (Meteorology Department) हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, जूनमध्ये देशाच्या अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या तीव्र उष्मा आणि उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
देशात मान्सून कधी दाखल होणार?
दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा-चंडीगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये (Heat stroke) उष्णतेसह उष्णतेच्या लाटेची स्थिती काही दिवस कायम राहील, असे (Meteorology Department) हवामान खात्याने सांगितले आहे. यावेळी, (IMD) आयएमडीच्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून येत्या तीन ते चार दिवसांत केरळमधून देशात दाखल होऊ शकतो.
या राज्यांमध्ये कडक उन्हापासून दिलासा मिळणार?
IMD ने जारी केलेल्या अलर्टनुसार, 28 मे ते 1 जून या कालावधीत पंजाब, हरियाणा-चंदीगड, दिल्ली, राजस्थानचे अनेक भाग, उत्तर प्रदेशचे काही भाग आणि मध्य प्रदेशच्या विविध ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. (Meteorology Department) हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, जम्मू विभाग, हिमाचल प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशामधील वेगळ्या ठिकाणी (Heat warning) तीव्र उष्णतेची शक्यता आहे.
Prevailing heat wave to severe heat wave conditions over Northwest & Central India likely to reduce gradually from 30th May, 2024. pic.twitter.com/WG7rkqGbxN
— India Meteorological Department (@Indiametdept) May 28, 2024
या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस?
हवामान खात्याच्या (Meteorology Department) माहितीनुसार, मेघालयात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. यावेळी IMD ने आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. विभागानुसार या दोन्ही राज्यांमध्ये 28 मे ते 1 जून या कालावधीत (Heavy Rain) मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD च्या माहितीनुसार, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 29 मे रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रेमाल चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान
यावेळी, (Cyclone Remal) चक्रीवादळ रामलने पश्चिम बंगालसह ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये प्रचंड विध्वंस केला आहे. आसाममध्ये वादळामुळे जोरदार वारा आणि (Heavy Rain) मुसळधार पावसामुळे दोन जणांचा मृत्यू झाला, असून 17 जण जखमी झाले आहेत. लखीमपूर जिल्ह्यातील गेरुकामुख येथे निर्माणाधीन लोअर सुबनसिरी जलविद्युत प्रकल्पात संततधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात पुतुल गोगोई नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, असे राज्य अधिकाऱ्यांनी PTIला सांगितले आहे.