देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (heavy rain) : पहिल्याच दमदार पावसाने तासभर जोरदार हजेरी लावली आणि (Chikhali rain) मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी होवून रस्त्यांवरील मोठ मोठ्या खड्ड्यात पाणी साचले. त्यामुळे मुख्य रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न निर्माण झाला असल्याने नागरीकांना रस्त्यावरुण जाणे येणे करतांना तसेच वाहन धारकांना वाहने चालवितानामोठी कसरत करावी लागत आहे.
चिखली तालुक्यातील (Chikhali taluka) अंचरवाडी गावाची लोकसंख्या अडीच ते तीन हजार पर्यत असून गावात राजकीय लोकांचा चांगला दबदबा आहे. हे गाव चिखली ते दे राजा या हायवे रोडला लागून असल्याने फाट्या पासून तर गावा पर्यत आणि गावांच्या मध्यभागातून शे. आटोळ गावाकडे रस्ता गेलेला आहे. मात्र या (Chikhali Road) मुख्य रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने या रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील खडीही अस्ताव्यस्त रस्त्यावर पडलेली दिसून येत आहे. यामुळे दुचाकी वाहनधारकांना आपले वाहन चालवताना मोठी अडचण येत आहे.
पहिल्याच दमदार पावसामुळे मुख्य रस्ता गेला गटारात
रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न सध्या गावकऱ्यांना पडला आहे. (Chikhali Road) रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसा पावसाने तासभर जोरदार हजेरी लावली रस्त्यांवरील खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहन खड्ड्यात जावून अपघाताचे प्रकार घडत आहेत. रस्त्याला लागून किराणा दुकान, हेअर सलून , तसेच गावकऱ्यांच्या लहान मोठ्या घराचे वास्तव्य आहे. त्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या वाहनाचे घाण पाणी घरात व दुकानात उडत असल्याने घाण पाण्याच्या दुर्गंधीमुळे गावकऱ्यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. अनेक महिन्या पासून गावकऱ्यांनी रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती परंतु संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे गावाच्या मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
अंचरवाडी येथील गावकऱ्यांची झाली डोकेदुखी
याबाबत सरपंच कोकिळाताई परिहार यांनी सांगीतले की हायवे रस्त्यापासून तर शे आटोळ गावापर्यत रडत्याचे दुरुस्तीचे काम मंजूर झाले आहे. मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे काम (heavy rain) पावसाळयापूर्वी केले नाही. त्यामुळे गावातील (Chikhali Road) मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून, या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असल्याने गावकऱ्यांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी सुध्दा संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येईल, असे दै देशोन्नती शी सांगण्यात आले .