मानोरा (Heavy rain) : तालुक्यात मान्सून पूर्व पावसाने आज सायंकाळी हजेरी लावल्याने नागरीकांना (Heavy rain) उकाडापासून थोडी फार सुटका मिळाली आहे. शेतकऱ्याची आता खरीप हंगामासाठी (Kharif season) लगबग सुरू झाली आहे. माहितीनुसार, आज सकाळ पासूनच कडक उन्ह तापत होते. दुपारी तीन वाजतापासून आभाळात ढग दाटून आले. त्यानंतर सायंकाळी मान्सून पूर्व पावसाला (Heavy rain) सुरुवात झाली. जवळपास तासभर पावसाने हजेरी लावल्याने गारवा निर्माण झाला होता.
शेतकऱ्यांनी मशागतीचे काम पूर्ण केल्यानंतर पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. शेवटी गुरुवारी (Heavy rain) पावसाने मान्सून पूर्व हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. उद्यापासून (Kharif season) खरीप हंगामाच्या बियाणे खरेदीला सुरुवात होणार होणार आहे.