जकार्ता (Heavy rain) : पाऊस पडण्यासाठी क्लाउड सीडिंगचा (Cloud seeding) वापर करण्यात येतो. परंतु पूरग्रस्त भागात अधिक पाऊस टाळण्यासाठी इंडोनेशिया क्लाउड सीडिंगचा वापर करण्यात येत आहे. (Indonesia flood) इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळे 67 लोकांचा मृत्यू झाला, तर 20 जण बेपत्ता झाले. यादरम्यान 44 जण जखमीही झाले आहेत. पुरामुळे अनेक घरे पाण्यात वाहून गेली. यामुळे 1500 कुटुंबांना तात्पुरत्या निवाऱ्यात जावे लागले आहे.
सरकारकडून मदतकार्य सुरू आहे, मात्र आणखी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मदतकार्यात अडथळे येण्याची भीती आहे. हे टाळण्यासाठी अधिकारी क्लाउड सीडिंग (Cloud seeding) पद्धतीचा वापर करून पूरग्रस्त भागात पाऊस वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ढगांवर मोठ्या प्रमाणात (sodium chloride) सोडियम क्लोराईडची फवारणी करण्यात आली. इंडोनेशियाला अनेकदा (Indonesia flood) मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि पुराच्या समस्येचा सामना करावा लागतो. डोंगरावरून येणाऱ्या ढिगाऱ्यांमुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.