रिसोड (heavy rain) : तालुक्यातील (Risod Taluka) वाकद येथे आज संध्याकाळी पाचच्या दरम्यान (heavy rain) अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. अचानक आलेला अवकाळी पावसामुळे वाकद हे जलमय झाला होता. मात्र वादळ वाऱ्याने गावकऱ्यांमध्ये धडकी भरवली होती. वाकद गावासह शेतामधील अनेक झाडे वादळ वाऱ्यामुळे पडली होती. गावामध्ये तर अनेकांचे मोठे नुकसान झाले असल्याचेही कळाले. अनेक नागरिकांचे घरावरील पत्रे उडाली. (Heavy damage) झाडे कोसळून काही भिंतीचेही नुकसान झाले, असल्याची माहिती समोर आलेली आहे.
अवकाळी पावसाने उन्हाळी भुईमूग व मुगाचे मोठे नुकसान (Heavy damage) झाले. भाजीपाला पिकासह फळबाग पिकांना याचा फटका बसलेला आहे. वादळी वाऱ्यामुळे वाकद गावाजवळ काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने रिसोड मेहकर मार्गाची वाहतूक तब्बल एक तास विस्कळीत झाली होती. दुचाकी स्वरांनी आपली दुचाकी शेतातून काढल्या. मात्र मोठ्या वाहनांना काही पर्याय नसल्याने त्यांना झाड हटण्याची वाट बघावी लागली. एक ते दीड तासानंतर सदर झाड हटवल्याने वाहतूक सेवा पूर्ववत सुरू झाली. मात्र या दरम्यान वाकद व परिसरातील नागरिकांना वादळी वाऱ्याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागला. (heavy rain) वादळ वाऱ्यामुळे वाकद परिसरातील विद्युत खांब व तारा कोसळल्याने या भागातील विद्युत पुरवठा ही खंडित झाला होता तर गावात आधांराचे साम्राज्य निर्माण झाले होते. आजच्या या घटनेनंतर वाकद वासियांमध्ये एक शंकास्पद भीती निर्माण झालेली आहे. पुन्हा अशा प्रकारे वादळी वारा होईल का अशी भीतीयुक्त चर्चा गावामध्ये होत आहे.
आज संध्याकाळी वाकद गावामध्ये (heavy rain) अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह वाकदवासियांचे अतोनात नुकसान झालेले आहे. गावातील टीन पत्रे उडणे व भिंतीला तडे जाणे झाड पडून झालेले नुकसान झाले. यासह शेतकऱ्यांचे शेत पिकांचे नुकसान (Heavy damage) झालेले असून शासनाने सर्वे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.