हातरुण येथील घटना
हातरुण (Heavy rain) : मातीच्या घरात पावसाचे पाणी मुरल्याने अचानक घराची भिंत कोसळली. भिंत अंगावर पडल्याने (Woman injured) महिला गंभीर जखमी झाल्याची घटना बाळापूर तालुक्यातील हातरुण गावात बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. जखमी महिलेवर हातरुण (Hatrun Hospital) प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्यात पा’विण्यात आले आहे.
जखमी महिलेवर अकोल्यात उपचार सुरू
हातरुण येथे सोमवारी रात्री दरम्यान पाऊस आला. या (Heavy rain) पावसाचे पाणी मातीच्या घरात मुरल्याने राजेश नागे यांच्या राहत्या घराची समोरची भिंत बुधवारी दुपारी अचानक पडली. यावेळी शोभा नागे, निकिता नागे, रोहिणी नागे आणि रोशनी नागे या घरात बसलेल्या होत्या. मातीची भिंत रोशनी नागे (२१) या महिलेच्या अंगावर पडल्याने त्या भिंतीखाली दबल्या होत्या. यावेळी शोभा नागे, निकिता नागे, रोहिणी नागे यांनी भिंतीखाली दबलेल्या रोशनी नागे यांना बाहेर काढले. (Woman injured) जखमी झालेल्या रोशनी नागे यांना उपचारासाठी हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्रात (Hatrun Hospital) नेण्यात आले. याठिकाणी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नलिनी तायडे यांनी जखमी महिलेची तपासणी करून प्राथमिक उपचार केले. जखमी महिलेला पुढील उपचारासाठी (Akola Hospital) अकोला येथे पाठविण्यात आले आहे. राजेश नागे यांच्या राहत्या घराची भिंत पडल्याने संपूर्ण घराचे नुकसान झाले आहे. घरातील साहित्य व धान्याचे नुकसान झाले असून या नुकसानीचा पंचनामा करून मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.