अर्जुनी/मोर (Heavy rain) : बोडगाव देवी येथील भूमिताबाई भुमेश्वर लंजे वय वर्ष 45 यांचे आज दिनांक 06/06/24ला सायंकाळी 5.00वा आलेल्या (heavy rain) वादळी पाऊस व विज कडाडल्याने, (Gondia lightning) वीज कोसळून महिलेचा तिच्या राहत्या घरी मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूमुळे बोडगाव देवी व परिसरात शोककळा पसरली सदर महिलेवर अर्जुनी मोर येथे शवविच्छेदन करून प्रेतकुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. महिलेवर दिनांक 07/06/2024 ला सकाळी 7:00 गावाशेजारील मोक्षधामवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मृत्यूपश्चात पती, दोन मुली, एक मुलगा बराच मोठा परिवार आहे. तिच्या कुटुंबाला शासकीयआर्थिक मदत मिळावी, अशी जनतेची मागणी आहे.