१६ जानेवारी पासुन तहसील कार्यालया समोर आंदोलन
कानसुर ,डाकुपिंपरी व तारुगव्हाण येथिल शेतकर्यांचे प्रशासनास निवेदन
परभणी/पाथरी (Farmers Strike) : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान ई -केवायसी केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत नसल्याने संतापलेल्या कानसुर येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर येत्या गुरुवार पासून बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात मंगळवारी प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे.
पाथरी तालुक्यातील चारही महसूल मंडळामध्ये मागील खरीप हंगामामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीचा पाऊस झाला होता. यावेळी शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. (Farmers Strike) बाधित शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत म्हणून सरकारकडून अनुदान घोषित करण्यात आले होते. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ५८ कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली होती.
दरम्यान तालुक्यातील ४८हजार ७०० बाधीत लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती महा आयटी पोर्टल वर अपलोड करण्यात आली होती. यापैकी ई -केवायसी केलेल्या २० हजार १५ शेतकऱ्यांना २४कोटी ५० लाख रुपयांची रक्कमही खात्यावर वर्ग करण्यात आली होती. दरम्यान १ जानेवारीपर्यंत ई -केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु (Farmers Strike) शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडण्यास विलंब होत असल्याने आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी घायमिटीला आला असून अनुदान वर्ग तात्काळ करा आंदोलनाच्या तयारीत आहे.
मंगळवार १४ जानेवारी रोजी तालुक्यातील कानसुर (Farmers Strike) शेतकऱ्यांनी प्रशासनात निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, कानसुर सज्जा मध्ये ऑगष्ट – सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे झालेले नुकसानीचे नुकसान भरपाई अनुदान अद्यापही मिळालेले नसल्याचे निदर्शनास आणून देत तालुक्यातील बऱ्याच गावांचे अनुदान वितरीत झालेले आहे असल्याचे म्हटले आहे. कानसुर ,डाकुपिंपरी व तारुगव्हाण या गावाचे अतिवृष्टीचे अनुदान जमा झालेले नसल्याचेही नमुद केले आहे.
या गावांचे अनुदान तात्काळ जमा न केल्यास गुरुवार १६ जानेवारी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे (Farmers Strike) आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दिलेल्या निवेदनावर कानसुर ,डाकुपिंपरी व तारुगव्हाण येथिल संदीप बालासाहेब शिंदे ,अनंता काकडे , दत्ता शिंदे , भागवत कोल्हे , सुंदर काकडे ,सोपान शिंदे , अनिल शिंदे ,वैजनाथ रेडे ,कल्याण महात्मे , अर्जुन महात्मे , माणिक पौळ ,माऊली महात्मे , एकनाथ मधुकर शिंदे ,गोकुळ शिंदे आदीं
शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.