मानोरा(Washim):- तालुक्यात सार्वत्रिक पावसाने शनिवारी मध्यरात्रीपासून जोरदार सुरूवात केल्यामुळे शेतामध्ये पाऊस मोठया प्रमाणात साचले आहे. संततधार पाऊस सतत तीन दिवसांपासून दिवस व रात्र सुरूच असल्याने या पावसाचा फटका शेतीसह शेतातील पिकांना बसला आहे.
पावसाने हाहाकार माजविल्यामुळे शेतात पाणी साचून पिकांची वाढ खुंटत आहे
सोयाबीनला शेंगा लागायला सुरूवात झाली असुन पाऊस, हुमनी अळीचे आक्रमण व पिवळा मोझक रोगांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन(soybeans) उत्पादनावर परीणाम होण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत. एकंदरीत आता पावसाने विश्रांती घेतली नाही तर सोयाबीन सह इतर पिकेही उध्वस्त होण्याची चिन्हे दिसत आहे. पोळा सणाच्या आदल्या दिवसापासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. तीन दिवस उलटूनही पाऊस उसंत देत नसल्याने हाहाकार माजला आहे. शेतकऱ्यांनी पीक कर्ज व सावकारी कर्ज घेऊन आतापर्यंत शेतातील पिके आपल्या मला बाळाप्रमाणे जगवली आहे. उसनवारी कर्ज काढत विविध रोगांच्या प्रादुर्भावापासून पिके वाचविण्यासाठी महागडी कीटक नाशक औषध(Medicines) खरेदी करत फवारणी केली आहे. ते खर्च असाच पाऊस कोसळत राहिला तर शेतीला लावलेला पैसा वसूल होते की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.