देशोन्नती वृत्तसंकलन
अकोला (Heavy rains) : यंदा खरीप हंगामात जून व जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे ९ हजार ५८८ हेक्टरवरील पिकांना जबर तडाखा बसला असून, ९ कोटी ६४ लाख ५३ हजाराचे नुकसान झाले आहे. या (Heavy rains) अतिवृष्टींमुळे १५२ गावांमध्ये नुकसान झाले असून, नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे आता शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
यंदा जून महिन्यात पहिले दहा दिवस पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात उघडीप होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मात्र पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. बार्शीटाकळी, बाळापूर, अकोला तालुक्यात अतिवृष्टी झाली. काही दिवसांचा अपवाद वगळल्यास रोज काही ठिकाणी पाऊस पडला. जुलै महिन्यातही प्रचंड पाऊस (Heavy rains) झाला. अनेक वेळा १० पेक्षा जास्त मंडळांमध्ये अतिवृष्टीही झाली. परिणामी, कापूस, सोयाबीन पिकांची हानी झाली. मोर्णा नदीच्या पुराचा जबर तडाखा बसला होता.
सर्वाधिक हानी अकोला तालुक्यात
अकोला तालुक्यातील सर्वाधिक ६८ गावातील शेतीला (Heavy rains) अतिवृष्टीचा फटका बसला. बार्शीटाकळी- ५८, मूर्तिजापूर- ८, पातूर – १४ व अकोट तालुक्यातील ४ गावांमध्ये नुकसान झाले. नदीव नाल्याकाठच्या शेतातून पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते. जिल्हा परिषद, कृषी व महसूल विभागाकडून संयुक्त पंचनामे करण्यात आले.
152 गावे प्रभावित; साडेनऊ कोटींवर नुकसान
यंदा जून महिन्यात पहिले दहा दिवस (Heavy rains) पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात उघडीप होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मात्र पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. बार्शीटाकळी, बाळापूर, अकोला तालुक्यात अतिवृष्टी झाली.
सर्वाधिक कापूस, सोयाबीनचे नुकसान
या (Heavy rains) अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले असले तरी सर्वाधिक नुकसान कापूस व सोयाबीनचे झाले आहे. खरीप हंगामातील ही दोनच पिके प्रमुख असून, या पिकांनाच सर्वाधिक फटका बसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. गत खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. या हंगामातही तेच चित्र पुन्हा निर्माण होत असून, शेतकरी नैसर्गिक संकटापुढे हतबल आहेत. तर शासनाकडूनही फारसा दिलासा नसल्यामुळे शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकत आहे.