कोरची(Gadchiroli):- कोरची तालुक्यातील अतिदुर्गम, ग्रामीण भागातील खेळाडूंना आयोजित केपीएल क्रिकेट स्पर्धेच्या (Cricket Tournament)माध्यमातून खेडण्याची आणि पुढे जाण्याची उत्कृष्ट संधी मिळाली आहे याचे सोन केलं पाहिजे या केपीएल लिग मधून सर्वोत्कृष्ट खेडणाऱ्या खेळाडूला आयपीएल मध्ये सहभागी होण्यास मदत करणार असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केला आहे. ते १० जानेवारी रोजी लगान क्रिकेट ग्राउंड कोरची प्रीमियर लिग २०२५ रात्रकालीन क्रिकेटच्या भव्य उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कोरचीत रात्रकालीन केपीएल क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बेडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे होते उद्घाटन माजी आमदार कृष्णा गजभे यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रशांत गड्डम, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सेवानिवृत्त प्राचार्य देवराव गजभिये, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष सदरुद्दीन भामानी, नगरसेवक डॉ शैलेंद्र बिसेन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आनंद चौबे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बुंदे, योगेश पवार, भाजपा तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी, काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल,सहयोग बँक संचालक रितीक गडपायले, प्राचार्य उमाकांत ढोक, डॉ. मुरलीधर रुखमोडे, तालुका मुक्तिपथ निळा किलनाके, पत्रकार नंदू वैरागडे, राहुल अंबादे, सूरज हेमके, अविनाश हुमने, मनीष हलामी, नरेंद्र जुळा, राहुल मांडवे, देवानंद भोयर, सिद्धांर्थ सेंगार, सौरभ वाजपेयी, नसीम पठाण, निर्मल धमगाये आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार प्रशांत गड्डम, एपीआय मुकुंद देशमुख प्राचार्य देवराव गजभिये भाजप नेते आनंद चौबे यांनी यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले.
१४ धावांनी रेड रोज संघ विजयी
यानंतर क्रिकेटच्या मैदानावर विधिवत पूजा करून फित कापून क्रिकेटचे उद्घाटन करण्यात आले. सहभागी खेळाडू मादक पदार्थाचे सेवन करणार नाही अशी शपथ घेण्यात आली. दरम्यान माजी आमदार कृष्णा गजबे, वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे व एपीआय मुकुंद देशमुख यांनी हातात बॅट घेऊन चौफेर फटकेबाजी करीत क्रिकेटचा आस्वाद घेतला. यानंतर अंकित इलेव्हन संघ विरुद्ध रेड रोज संघ मध्ये पहिला सामन्यात १४ धावांनी रेड रोज संघ विजयी झाले. तालुक्यातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावे म्हणून येथील समाजसेवक व व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन मागील वर्षीपासून केपीएल रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेची सुरवात केली आहे.
एकूण ३२ क्रिकेट सामने रंगणार
यावर्षी सुद्धा दहा रात्रकालीन केपीएल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली असून यावेळी आठ टीम असून एकूण ३२ क्रिकेट सामने रंगणार आहेत. दरम्यान येथे बाहेरील क्रिकेट असोसिएशनचे एम्पायर बोलाविण्यात आले आहे. तसेच खास क्रिकेटची आवड ठेवणाऱ्या प्रेक्षकांसाठी पहिल्यांदाच youtube वर मॅच लाईव्ह दाखविले जात आहे. या उद्घाटनीय खेळाचे प्रास्ताविक नगरसेवक घनश्याम अग्रवाल, संचालन किशोर ढवळे तर आभार डॉ. स्वप्निल राऊत यांनी मानले. यशस्वीतेसाठी केपीएल गव्हर्निंग बॉडी आयोजक नासिर भामानी, घनश्याम अग्रवाल, डॉ.स्वप्नील राऊत, नितीन रहेजा, स्वप्नील कराडे, किशोर ढवळे, प्रशांत कराडे, विशाल वडीकर, चेतन कराडे यांचे अथक सहकार्य आहे.