सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी जाणल्या पिडीतांच्या वेदना!
रिसोड (Helping Hands) : मा.विष्णुपंत भुतेकर संस्थापक अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील पाचंबा येथील शेतकरी अत्महत्या ग्रस्त कुटुंबाला सात्वनपर भेट, साडी चोळी देउन आर्थिक मदतीचा हात देउन वाढदिवस साजरा. तालुक्यातील पाचंबा येथील धनंजय गव्हाणे वय 45 या शेतकऱ्यांनी नापिकी व आर्थिक विवंचनेला ला कंटाळून गळफास घेऊन 29 मार्च रोजी आत्महत्या केली होती या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला एक शेतकरी परिवारातील मायेचा आधार म्हणून भूमिपुत्र संघटनेच्या वतीने एक सामाजिक उपक्रम (Social Activity) राबविण्याची ध्येय ठेवले होते.
भूमिपुत्र संघटना खंबीरपणे उभे राहाण्याचे आश्वासन!
त्या अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमाला फाटा देऊन दुष्काळग्रस्त स्थितीमुळे केवळ तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला प्रत्यक्ष भेट देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. या मध्ये रिसोड तालुक्यातील ग्राम पाचांबा येईल शेतकरी धनंजय जनार्दन गव्हाणे या कर्ज बाजारी शेतकऱ्यांने 9 मार्च 2025 ला गळफास घेऊन जिवन यात्रा संपविली. निराधार झालेल्या कुटुंबातील पत्नी,मुलाबाळांवर आर्थिक मदतीचा हात देउन भूमिपुत्र संघटनेच्या वतीने साडी चोळी देउन भविष्यामध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबाला केव्हाही कुठेही प्रकारची गरज पडेल तेव्हा तुमच्या पाठीशी भूमिपुत्र संघटना खंबीर पणे उभे राहाण्याचे आश्वासन यावेळी सभापती श्री विष्णुपंत भुतेकर यांनी दिले. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे (Bhumiputra Farmers’ Association) राज्य प्रवक्ते श्री जितेंद्र गवळी,संचालक रवींद्र पाटील चोपडे,पत्रकार गजानन खंदारे, सरपंच विष्णुभाऊ जाधव, किसन पिटकर,हरिभाऊ बाजड, पत्रकार सतीश मांदळे,महादेव घुगे,महावीरसिःह ठाकूर,संतोष गव्हाणे शंकर सदार,विजय मुटकुळे,दिलीप भोसले,अजय गव्हाणे,सोपान गव्हाणे,विठ्ठल ईढोळे,गणेश हिवाळे,अशोक गव्हाणे,मोहन गव्हाणे,वसंता गव्हाणे,सुरेश गव्हाणे,विठ्ठल गव्हाणे,विजय गव्हाणे,गुलाब गव्हाणे रामचंद्र गव्हाणे,नारायण ईढोळे,नवनाथ वानखेडे,गजानन गव्हाणे आदी उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक महावीर सिंग ठाकुर यांनी केले तर आभार संतोष गव्हाणे यांनी केले.




