मंत्रीपदाचा दर्जा
हिंगोली (Hemant Patil) : येथील शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांना वसमत येथील हळद संशोधन केंद्राच्या (Turmeric Research Center) अध्यक्ष पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. हे पद मंत्री दर्जाचे राहणार असून अध्यक्षांच्या सोयी-सुविधांसाठी लागणारा खर्च संशोधन केंद्राकडे उपलब्ध असलेल्या निधीतून केला जाणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून निवडून आलेले हेमंत पाटील (Hemant Patil) हे खासदार असतानाच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांच्या नावाने उमेदवारी जाहीर झाली; परंतु त्यांना मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यामुळे ऐनवेळी त्यांच्या जागी बाबुराव कोहळीकर यांना तिकीट देण्यात आले.
हेमंत पाटील यांच्या पत्नी राजर्षी पाटील (Hemant Patil) यांना वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. तेथे त्यांना पराभव पत्करावा लागला. अवघ्या काही दिवसांत आचार संहिता लागणार असून दोन ते तीन महिन्यांत विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. या पृष्ठभूमिवर वसमत येथील हरीद्रा हळद संशोधन (Turmeric Research Center) व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करून पक्षाने त्यांचे राजकीय पुनर्वसनच केले आहे. याबाबत १६ सप्टेंबर रोजी शासनाकडून काढण्यात आलेल्या पत्रात त्यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.