54 लाख 83हजार 400दंड…प्रलंबित जुना 12लाख 80 हजार रुपयाचा दंड वसूल
आखाडा बाळापूर (Highway Police) : महामार्ग पोलीस केंद्र येलकी हिंगोली जिल्हा वतीने महामार्गावर व इतर भागात बेशिस्त वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी सन 2024 या वर्षात तब्बल 7 हजार 240 विविध वाहनावर कार्यवाही करून 54 लाख 83 हजार 400 रूपयाचा दंड आकारण्यात आला तर सन 2024 मध्ये वाहनावरील प्रलंबित जुना दंड 12लाख 80 हजार 50 रूपये वसूल करण्यात आला.
महामार्गावर दोन वर्षांपूर्वी कळमनुरी तालुक्यातील येलकी शिवारात महामार्ग पोलीस केंद्र हिंगोली स्थापन करण्यात आले. (Highway Police) महामार्गावर सतर्क गस्त घालणे व सुरक्षा प्रदान करणे,अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळण्यास मदत करणे,महामार्गावरील नादुरुस्त वाहने बाजूला घेणे व संकटात सापडलेल्या वाहन चालकास व प्रवाशांना मदत करणे,महामार्गावरील प्रवाशांना नजीकच्या हॉस्पिटल,पेट्रोल पंप, पोलीस स्टेशन,विश्रामगृह इत्यादी माहिती देणे,महामार्गावर वाहतूक खोळंबा होउ नये याची दक्षता घेणे,वारंवार प्राणघातक अपघात होणाऱ्या महामार्गावरील ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करणे,गस्त पथकाला बघून निसटलेली संशयित वाहने अडविण्यासाठी स्थाई महामार्ग पोलीस केंद्राला तात्काळ संपर्क करणे महामार्ग पोलीस केंद्राचे उदिष्ट्ये आहेत.
2024वर्षात केसेस व दंड
जानेवारी 2024 मध्ये (Highway Police) महामार्ग पोलीस पथकाने 493 विविध वाहनावर केसेस करून. 2 लाख 54 हजार 500 दंड आकारला तर फेब्रुवारी महिन्यात 505 केसेस करून दंड. 2 लाख 49 हजार 900 आकारला तर मार्च महिन्यात 634 वाहनावर केसेस 3लाख 58 हजार 900 दंड ,एप्रिल महिन्यात 554केसेस व 3 लाख 9 हजार दंड मे महिन्यात 557केसेस व 2 लाख 90हजार 400 दंड आकारला जुन महिन्यात. 590 केसेस व 4लाख 31 हजार 500 दंड जुलै महिन्यात 402 केसेस व 3लाख 57 हजार 800 दंड ऑगस्ट महिन्यात 495 केसेस 4 लाख 58 हजार 700 दंड सप्टेंबर महिन्यात 504 केसेस व 4लाख 88 हजार 700 दंड आकारला. आक्टोबर महिन्यात 786 केसेस व दंड 7 लाख 35 हजार 200 रूपये.नोव्हेंबर महिन्यात 749केसेस व दंड 6लाख 77 हजार 700 रूपये. डिसेंबर महिन्यात सर्वाधिक 971केसेस व दंड 8 लाख 71 हजार 100 रूपये आकारण्यात आला. 2024 मधे 7240 केसेस होउन 54 लाख 83 हजार 400 एकुण दंड आकारण्यात आला.
सदर वाहनावर कार्यवाही करता (Highway Police) पोलीस उपनिरीक्षक शेख उमर व शैलेश मुदीराज बरोबर खियामोद्दीन खतीब, शेषराव पोले,अशोक खोंडकर, सय्यद तयब अली,मोतीराम लोखंडे, गजानन तायडे, बळीराम शिंदे, सोपान थिटे, दिनकर बांगर, अनिल वाघमारे, मोहम्मद वसीम, रूपेश धाबे, राजाराम कदम, अरविंद गजभार, रंगनाथ सातभाई, नवनाथ शिंदे, शेख असीम, विकास गवळी, रवी बांगर, गजानन आगलावे, प्रवीणकुमार राठोड, तुकाराम जोगदंड, गजानन कोरडे, संदीप घुगे, युवराज कांबळे, नितीन जाधव, गजानन ढाले, सचिन कुटे,कैलास आडे, तान्हाजी खोकले व महामार्ग कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. रस्ते अपघात टाळण्यासाठी व वाहतूक नियम जनजागृती करता महामार्ग पोलीस पथकाने 68 ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेतले.
जुना प्रलंबित 12 लाख दंड वसूल..
महामार्ग पोलीस (Highway Police) पथकाने जुना प्रलंबित दंड वसूल मोहीम अंतर्गत 2024मध्ये जानेवारी महिन्यात 1लाख 35 हजार 150,फेब्रुवारी मध्ये 83 हजार 900 रूपये तर मार्च महिन्यात 1लाख 12 हजार 100,एप्रिल महिन्यात 40हजार 600.मे महिन्यात 68 हजार 300 रूपये जुन मध्ये 88 हजार 050,जुलै1लाख24 हजार 750,ऑगस्ट महिन्यात 1लाख5 हजार 100 सप्टेंबर मध्ये 1लाख 21हजार 600,आक्टोबर 1 लाख 6 हजार 700,नोव्हेंबर महिन्यात 81 हजार 500 व डिसेंबर महिन्यात 1 लाख 40 हजार 300 रूपय असा 12 लाख 8 हजार 50 रूपये जुना प्रलंबित दंड वसूल महामार्ग पोलीस यांनी केला.