२२ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ति भूषण गवई यांच्यासह अनेक न्यायमुर्तिची उपस्थिती
हिंगोली (Higoli District) : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन २२ फेब्रुवारीला होणार आहे. त्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ति भूषण गवई यांच्यासह ३० ते ३५ न्यायमुर्ति उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या (Higoli District) बंदोबस्तानिमित्त सोमवारी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शासकीय विश्रामगृह परिसरात पाहणी करून आढावा घेतला.
२२ फेब्रुवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ति भूषण गवई यांच्यासह इतर बॉम्बे हायकोर्ट, छत्रपती संभाजी नगर खंडपीठ, नागपूर, गोवा आदींसह ३० ते ३५ न्यायमुर्तिची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, (Higoli District) उपविभागीय पोलिस अधिकारी अंबादास भुसारे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी १७ फेब्रुवारी सोमवार रोजी हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहात भेट देऊन तेथील बंदोबस्ताच्या दृष्टीकोणातून पाहणी केली.