‘मला निवडणूक लढवायची नव्हती पण…’
Himachal Lok Sabha Election : कंगना रनौतचा (Kangana Ranaut) मंडी मतदारसंघातून विजय झाल्यानंतर, विक्रमादित्य सिंह यांनी सांगितले की, मी लोकसभा निवडणूक लढवू इच्छित नाही. आपला पराभव मान्य करत त्यांनी जनतेचा निर्णय मान्य केला आहे. (Mandi Lok Sabha) मंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार कंगना राणौत यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांचा पराभव केला.
विक्रमादित्य सिंह (Vikramaditya Singh) आणि कंगना रणौत (Kangana Ranaut) यांच्या मतांचा फरक 74755 आहे. मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांनी कंगना रनौतचे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. जनतेने काँग्रेसला (Congress) पूर्ण पाठिंबा दिल्याचेही विक्रमादित्य सिंह म्हणाले. यासाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. ते म्हणाले की, वयाच्या 34 व्या वर्षी 4.50 लाख मते मिळणे ही छोटी गोष्ट नाही. हीच त्यांच्यासाठी भविष्याची व्होट बँक आहे.
विक्रमादित्य सिंह यांनी सांगितले की, त्यांना (Lok Sabha election) लोकसभा निवडणूक लढवायची नव्हती, पण त्यांनी ते आव्हान म्हणून स्वीकारले. विक्रमादित्य सिंह म्हणाले की, निवडणुकीच्या वेळीही ते सांगत राहिले की, मला लोकसभा निवडणूक लढवायची नाही. त्यांनी तिकिटासाठी अर्जही केला नव्हता. विक्रमादित्य सिंह म्हणाले की, (Mandi Lok Sabha) मंडी लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Constituency) मिळालेल्या जनमताचे मी मनापासून स्वागत करतो.