मुंबई (Hina Khan) : हिना खान सिने जगतातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. अभिनेत्रीची (Actress) फॅन फॉलोइंगही लाखोंच्या घरात आहे. टीव्ही इंडस्ट्रीची सुपरस्टार हिना खानने नुकतीच तिच्या चाहत्यांना सांगितले की, तिला कॅन्सर (Cancer) या गंभीर आजाराने ग्रासले आहे, तेव्हा चाहतेही अस्वस्थ झाले. मात्र, आता पुन्हा एकदा हिना खानच्या कॅन्सरच्या बातम्यांनी जोर धरला आहे. कारण खरंतर, ब्रेस्ट कॅन्सरची (Breast cancer) बातमी शेअर केल्यानंतर एकीकडे (Hina Khan) हिना खानला चाहत्यांकडून शोक व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे अभिनेत्रीलाही ट्रोल केले जात आहे. उमराहमध्ये फॅशन दाखवल्यामुळेच तिला इतका गंभीर आजार झाल्याचे चाहत्यांनी सांगितले. दरम्यान, हिनाच्या कॅन्सरच्या बातमीबाबत एका प्रसिद्ध ‘स्टार’ने मोठे वक्तव्य केले आहे.
प्रसिद्ध ‘स्टार’ने सर्व काही उघड केले!
हा प्रसिद्ध स्टार दुसरा कोणी नसून पुनीत सुपरस्टार आहे. बिग बॉस (Big Boss) मध्ये खळबळ माजवणाऱ्या पुनीत सुपरस्टारने एक व्हिडिओ (Video) शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने हिनाच्या कॅन्सरची बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे म्हटले आहे. पुनीत म्हणतो की, (Hina Khan) हिना खानला खरंच कॅन्सरसारखा गंभीर आजार असला तरी तिच्या अकाऊंटवर तिचा आजार कोण पोस्ट करतो? त्यांच्या आजाराचे अहवाल कोण पोस्ट करतात? हे लोक आजकाल आपल्या आजाराची सबब सांगताहेत. जेणेकरून सोशल मीडियावर फॉलोअर्स (Followers) वाढतील आणि व्ह्यूजही वाढतील. हिना खानला कॅन्सर आहे, असे मला वाटत नाही. काही दिवसांनी हिना खान पोस्टमध्ये म्हणेल की, मी पूर्णपणे ठीक आहे. चाहत्यांचे आभार, तुमच्या प्रार्थनांनी मला मदत केली.