यवतमाळ (Hindu march) : बांगलादेशातील अल्पसंख्यांक असणाऱ्या हिंदू जनसमुदायावर सातत्याने अत्याचार होत असून हा अत्याचार तात्काळ थांबावा आणि या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेले इस्कॉनचे संन्यासी स्वामी चिन्मय कृष्णदास यांना तात्काळ मुक्त करावे या सामान्य मागण्यांसाठी सकल हिंदू समाज (Hindu march) यवतमाळ द्वारा निषेध सभेचे आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आले 10 डिसेंबरला दुपारी तीन वाजता स्थानिक पोस्टल ग्राउंड समता मैदान येथून मोर्चाला सुरुवात झाली.