हिंगणघाट (Hinganghat) :- पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे तालुक्यातील कुटकी येथे नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) अवैधपणे वाळू वाहतूक करणार्या ९ ट्रकवर कारवाई केली. नऊही ट्रक जप्त करून तहसील कार्यालय हिंगणघाट येथे जमा करण्यात आले. २८ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
तहसील कार्यालय हिंगणघाट व जिल्हा खनिकर्म विभाग यांची सयुंक्त कारवाई, वाळू भरलेले नऊ टिप्पर जप्त
सर्व वाहनांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) (८)नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पत्र पाठवण्यात आले आहे. वाहनात किती वाळू साठा आहे याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या अहवालानुसार दंड आकारला जाणार आहे. दारोडा व शेकापूर बाई या दोन वाळू घाटातून मागील महिन्याभरापासून कधी दिवसा कधी रात्री अशा पद्धतीने अनधिकृतपणे रेतीची चोरी सुरू होती. याबाबत महसूल विभागास वारंवार निवेदने देखील देण्यात आले होते. किसान अधिकार अभियान यांनी खनीकर्म विभागाला देखील याबाबत निवेदन दिले होते. महसूल विभाग व खनिकर्म विभाग यांनी संयुक्तरित्या या सर्व निवेदनाची दखल घेत सापळा रचून ही कारवाई केली. तत्पूर्वी देखील अशाच पद्धतीची कारवाई अल्लीपूर येथे पोलीस विभागामार्फत करण्यात आली होती. मात्र यानंतर देखील वाळू माफियांकडून सातत्याने वाळूची तस्करी करणे सुरू होते. वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी म्हणून महसूल विभागाकडून, पोलीस विभागाकडून सातत्याने या मोठ्या कारवाई होत राहणे गरजेचे आहे. कारवाई जिल्हाधिकारी वन्मथी सी, उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे यांच्या मार्गदर्शनामध्ये तहसीलदार योगेश शिंदे, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्रीकांत शेळके, नायब तहसीलदार भलावी आणि अधिकारी, कर्मचार्यांनी केली.प्रतिनिधी
न्अवैध वाळू वाहतूक प्रकरणी कारवाई झालेल्या वाहनधारकांमध्ये पंकज बाबाराव निवल रा.भिवापूर, (ट्रक क्र.एमएच ३१- डीएस ००४८), भूषण मनोहर सुरकार रा. वर्धा (ट्रक क्र. एमएच ३६-एफ-२४७९), राजू तायवाडे रा. बोरगाव (मेघे), (एएमएच ३१-सीबी -२५००), संजय जुमडे रा. जुनापाणी वर्धा (एमएच ४०-एन-००१०), प्रमोद सुरेश घुमडे रा. येळाकेळी (एमएच ३२, क्यु – ६५५५) हितेश भांडेकर रा. येळाकेळी (एमएच ४१ – ६५८५) हितेश भांडेकर (एमएच ३२-४०८९) महेश हिरामण पंचभाई, रा. बोरगाव (एमएच २७-व्हीएक्स १४१३) दिपक राजू पारसे रा.तळेगांव (एमएच ४०-वाय ३७७६) यांचा समावेश आहे.




