हिंगोली (Hingoli 12th Result) : बारावीच्या निकालात उत्तीर्णतेची (12th Result) टक्केवारी एकुण विभागाची वाढली तशी (Hingoli District) हिंगोली जिल्ह्याचीही यंदा वाढली आहे. गतवर्षी पाचव्या क्रमांकावर असलेला हिंगोली जिल्हा यंदा तिसर्या क्रमांकावर आला आहे. मराठवाडा विभागाचा एकुण निकाल ९४.०८ टक्के लागला आहे. यामध्ये बीड जिल्हा ९५.७० टक्के उत्तीर्णतेसह प्रथम क्रमांकावर आहे. दुसर्या क्रमांकावर छत्रपती संभाजी नगर व जालना हे दोन जिल्हे आहेत. दोन्ही जिल्ह्यांच्या उत्तीर्णतेचे टक्केवारी ९४.७१ एवढी आहे.
तिसर्या क्रमांकावर हिंगोली जिल्हा (Hingoli District) असून उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ एवढी आहे. चौथ्या क्रमांकावर परभणी जिल्हा असून या जिल्ह्याची टक्केवारी ९०.४२ टक्ेक आहे. गतवर्षी पाचव्या क्रमांकावर असलेला हिंगोली जिल्हा यंदा तांत्रिकदृष्ट्या तिसर्या क्रमांकावर आला आहे. (12th Result) दुसर्या क्रमांकावर छत्रपती संभाजी नगर व जालना हे दोन जिल्हे असल्यामुळे हिंगोली तिसर्या क्रमांकावर आहे. गतवर्षी लागलेल्या ८७.८१ टक्के निकालाच्या तुलनेत यंदाचा जिल्ह्याचा निकाल ९१.८८ टक्के एवढा लागला आहे. अर्थात गतवर्षी पेक्षा यावर्षी निकालात ४.०७ टक्के वाढ झाली आहे. शिवाय विभागाच्या निकालापेक्षा जिल्ह्याचा निकाल २.२० टक्यांनी कमी आहे.
तालुकानिहाय निकालात पाहिले असता औंढा नागनाथ तालुक्याचा निकाल ९२.६३ टक्के लागला असून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. दुसर्या क्रमांकावर ९२.५७ टक्के निकालासह सेनगाव तालुका आहे. तर तिसर्या क्रमांकावर ९२.५६ टक्क्यांसह वसमत तालुका आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेला हिंगोली तालुका ९१.१६ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर असून शेवटच्या क्रमांकावर ९०.६३ टक्क्यांसह कळमनुरी तालुका आहे. (12th Result) नेहमी प्रमाणे यंदाच्या निकालातही मुली पाचही तालुक्यात पहिल्या क्रमांकावर आहेत. जिल्ह्यातील एकुण मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.१८ टक्के असताना मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.२९ टक्के आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यात मुले ८७.३७ टक्के तर मुली ९४.९०, कळमनुरी मुले ८७.५० तर मुली ९४.५०, वसमत तालुक्यात मुले ८९.८९ तर मुली ९६.०१, सेनगाव तालुक्यात मुले ९१.१५ तर मुली ९४.५८, औंढा नागनाथ मुले ९०.६७ तर मुली ९५.४८ टक्के उत्तीर्ण झाल्या आहेत.
वाणिज्यच्या निकालात हिंगोली जिल्हा दुसर्या क्रमांकावर
छत्रपती संभाजीनगर विभागात बारावी वाणिज्य परिक्षेच्या निकालात पहिल्या क्रमांकावर बीड जिल्हा असून त्याची टक्केवारी ९६.६१ आहे. तर दुसर्या क्रमांकावर (Hingoli District) हिंगोली जिल्हा आला आहे. वाणिज्य शाखेतून जिल्ह्याचा निकाल ९४ टक्के लागला आहे. जिल्ह्यात वाणिज्य शाखेतून ७२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ७१७ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. त्यापैकी ६७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेच्या प्रमाणात मुलीची टक्केवारी ९७.६९ टक्के असून मुलाची टक्केवारी ९०.५४ टक्के आहे.
विशेष प्राविण्यात वसमत तालुका अव्वल
बारावीचा जिल्ह्याच्या निकालात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होण्यात वसमत तालुका अव्वल असून ३५६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. दुसर्या क्रमांकावर सेनगाव तालुक्यातून ३०० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.याच शृंखलेत औंढा नागनाथ व हिंगोली हे दोन तालुके प्रत्येकी २३८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्याने तिसर्या क्रमांकावर आहेत. तर कळमनुरी तालुक्यातून केवळ ६७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. असे जिल्ह्यात एकुण ११९९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
कळमनुरी तालुका पिछाडीवरच!
हिंगोली जिल्ह्यात (Hingoli District) कळमनुरी तालुक्याचा शिक्षणात तिसरा क्रमांक यंदाही कायम राहिला आहे. विशेष म्हणजे प्रथम स्थानावर असलेल्या औंढा नागनाथ तालुक्याचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.६३ असताना कळमनुरी मात्र ९०.६३ टक्के घेऊन २ टक्क्यांनी मागासलेले आहे. वसमत तालुक्यातील ३५६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले असताना कळमनुरी तालुक्यात केवळ ६७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. याच वेळेला केवळ (12th Result) उत्तीर्ण श्रेणीत येणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार या श्रेणीत कळमनुरी तिसर्या क्रमांकावर आहे. अर्थात विशेष प्राविण्य मिळो अथवा न मिळो पण उत्तीर्णतेची खात्री असलेला तालुका अशी कळमनुरीची ओळख बनत आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देणे अत्यंत आवश्यक झाले आहे.