हिंगोली (सेनगाव/Hingoli) :- तालुक्यातील पुसेगाव येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाची ५१ फुटी श्री १००८ भगवान बाहुबली मुर्ति (statue) उभारण्यात आली आहे. या मुर्तिच्या प्राण प्रतिष्ठापणेचा मुहूर्त ठरला असुन २ ते ८ फेब्रुवारी २०२६ च्या दरम्यान प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा पार पडणार आहे.
८ फेब्रुवारी २०२६ च्या दरम्यान प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा पार पडणार
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे भगवान बाहुबली तिर्थक्षेत्राचे काम जवळपास तीन वर्षापासून सुरू आहे. या तिर्थक्षेत्र ठिकाणी महाराष्ट्रातील (Maharashtra)एकमेव बाहुबली क्षेत्र असुन या ठिकाणी ५ १ फुटाची मुर्ति उभारण्यात आली आहे. या मुर्ति निर्माण कार्यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तिंनी मोठा हातभार लावलेला आहे. तसेच तिर्थक्षेत्राचा विकास करण्याकरीता शासन स्तरावरूनही मोठा निधी प्राप्त झाला आहे. पुसेगाव येथे श्री १००८ भगवान बाहुबली मुर्ति प्राणप्रतिष्ठापणा २ ते ८ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. त्यानंतर भगवंताचा महामस्तक अभिषेक सोहळा पार पडणार आहे. यावेळी भारतातील लाखो भाविक हा सोहळा पाहण्याकरीता येणार आहेत. तसेच मुनिश्री १०८ विशेष सागरजी गुरूदेव यांनी प्रतिमा निर्माणकार्य केले असुन त्यांचे गुरुवर्य या सोहळ्यासाठी येणार आहेत. याच बरोबर सोहळ्या करीता जवळपास ५० ते ६० साधूसंत येणार आहे.
सोहळ्या करीता जवळपास ५० ते ६० साधूसंत येणार
या सोहळ्याकरीता हिंगोली विधानसभेचे (Hingoli Assembly) आमदार तान्हाजीराव मुटकुळे, कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच या तिर्थक्षेत्राच्या विकास कामासाठी तत्कालिन पालकमंत्री अब्दुल सत्तार, माजी खासदार हेमंत पाटील, माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, जिल्हाधिकारी तत्कालिन जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, माजी मंत्री तथा आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर, आमदार राजूभैय्या नवघरे, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ. गजाननराव घुगे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे, मिलिंद यंबल, स्व. माजी आमदार राजेंद्र पाटणी, गजानन खंदारे आदींनी सहकार्य केलेआहे. या कार्यक्रमासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आ. तान्हाजी मुटकुळे यांनी दिली आहे. या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्या निमित्त महोत्सव समिती अध्यक्ष जितेंद्र छाबडा, महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष रविकुमार कान्हेड, तेजकुमार झांझरी, महावीर बडजाते, धरमचंद्र गंगवाल, मुकूंद सावजी, विवेक कान्हेड, संजय वाळले, सुदर्शन कान्हेड, दशरथ मांगरुळकर, किर्तीचंद भुरे, योगेश कळमकर, आदी परिश्रम घेत आहेत.




