हिंगोली(Hingoli):- औंढा नागनाथ पंचायत समिती कार्यालयाच्या लेखा विभागातील खोलीत दस्ताऐवज (document) जळाले होते. सदर प्रकरणी पोलिसांनी त्या खोलीला सील ठोकल्यानंतर आता त्यामध्ये अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील पाच ते सहा वर्षाच्या कपातीच्या रकमेत अनियमितता
औंढा नागनाथ, सेनगाव पंचायत समिती कार्यालयात मागील पाच ते सहा वर्षाच्या कपातीच्या रकमेत अनियमितता झाल्याची तक्रार आयुक्त कार्यालयाकडे (Offices of the Commissioner) केली होती. त्यावरून या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याने जिल्हा परिषदेचे चौकशी पथक नियुक्त केले होते. या पथकाने औंढा नागनाथ पं.स.मधील लेखा विभागात (Accounts Department) जाऊन काही दस्ताऐवज तपासणीसाठी काढले होते, परंतु त्यानंतर अचानक खोलीला १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ दरम्यान आग लागून दस्ताऐवज जळून खाक झाले होते. या प्रकरणात औंढा नागनाथ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर सदर खोली सील केली होती. पोलिसांनी काही कर्मचार्यांची चौकशी केली असता सदर आगीची घटना संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली.
लागलेल्या आगीचे कारण शॉटसर्कीट नसल्याचे प्राथमिक दृष्टी स्पष्ट होऊ लागले
या आगीत नेमके कॅशबुक (Cashbook)कसे काय जळाले, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला. केलेल्या चौकशी दरम्यान खोलीला लागलेल्या आगीचे कारण शॉटसर्कीट नसल्याचे प्राथमिक दृष्टी स्पष्ट होऊ लागले आहे. दरम्यान, या प्रकरणात औंढा नागनाथ पंचायत समितीचे सहाय्यक लेखाधिकारी कैलास इंगोले यांनी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. ज्यामध्ये पंचायत समिती कार्यालयातील संगणक संच तसेच सन २०१८-१९ ते सन २०२३-२४ या कालावधीतील अभिकरण योजना, जिल्हा निधी, जिल्हा परिषदे सेस, हातपंप दुरूस्ती, १५ वा वित्त आयोगाच्या तपासणीसाठी बांधून ठेवलेले कॅशबुकचे गठ्ठे अज्ञात व्यक्तीने जाळून नुकसान केले. या लावलेल्या आगीत ४५ हजाराचा एक संगणक, १० हजाराचे इतर वस्तू असे एकूण ५५ हजाराच नुकसान केले.
तक्रारीत नमूद केल्याने औंढा नागनाथ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार शेख मोहंमद हे करीत आहेत.