Hingoli:- हिंगोली शहरातील अग्निशमन (fire fighting) सेवे मध्ये अधीक भर घालण्याच्या दृष्टीकोनातुन शासना मार्फत दोन अद्यावत अग्निशमन बुलेट (First responder bike) उपलब्ध करुन घेण्यात आली आहे. या वाहनाद्वारे शहरातील वर्दळीच्या व दुर्गम ठिकाणी सुद्धा अतीशय तातडीने आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे.
आगीची घटना घडल्यास त्यावर नियंत्रण मिळण्याकरता मोलाची मदत मिळणार
यावेळी मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते सदर दोन्ही अद्यावत अग्निशमन बुलेटला (First responder bike) पुष्पहार घालुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगर अभियंता रत्नाकर अडसिरे , उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, शाम माळवटकर, अग्निशमन अधिकारी भागवत धायतडक, अभियंता प्रतिक नाईक, किशोर काकडे, वसंत पुतळे, राजेश पदमने, स्नेहल आवटे, आनंद दायमा, विनय साहु, संजय दोडल, किशोर खडेलवाल, उतम जाधव, विजय रामेश्वरे, नितीन पहिनकर, संदिप घुगे, अशोक गवळे,देवीसींग ठाकुर, पंडित मस्के, नागश नरवाडे तसेच ईतर सर्व नगरपरिषद कर्मचारी, अग्निशमन कर्मचारी उपस्थित होते. हे दोन अत्याधुनिक अग्निशमन दलाचे बुलेट आल्याने लहान सहान गल्लीबोळात एखाद्यावेळी आगीची घटना घडल्यास त्यावर नियंत्रण मिळण्याकरता मोलाची मदत मिळणार आहे. यापूर्वीही हिंगोली नगरपालिकेकडे अग्निशमन दलात अनेक चार चाकी अत्याधुनिक वाहने उपलब्ध झालेले असताना आता या वाहन ताफ्यात दूध नवीन अग्निशमन बुलेटची भर पडली आहे.