हिंगोली (Hingoli):- वसमत शहरातील एका व्यक्तीने नातेवाईकाच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी सोने खरेदी केले असताना आरोपीने आम्हालाही सोने खरेदी करावयाचे आहे, असे सांगुन ३४ लाख ९० हजार रुपयाचे सोने घेऊन फसवणुक केल्याने पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नातेवाईकांच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी सोने खरेदी केले
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वसमत शहरातील शिवाजी नगर भागातील अब्दुल आहाद अब्दुल समद शेख यांनी नातेवाईकांच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी(Wedding events) सोने खरेदी केले होते. त्यानंतर आम्हालाही सोने खरेदी करावयाचे आहे असे सांगुन सय्यद अनवर सय्यद खैसर, इरशत बेगम सय्यद अनवर रा. नांदेड, संगिता कातोरे रा. काळीपेठ वसमत यांनी अब्दुल आहाद याच्या जवळील सोने घेऊन ते खरे आहे किंवा नाही याची शहानिशा करण्याकरिता मित्रांना दाखवतो असे म्हणुन सोने घेऊन जि.प. शाळेच्या (Z.P. School) मैदानामध्ये उभ्या असलेल्या असलम, इम्रान रा. निझामबाद या दोघांकडे घेऊन गेले.
सोने तपासण्याच्या नावाखाली हाती पडलेले सोने (Gold) घेऊन पलायन
या दोघांनी सोने तपासण्याच्या नावाखाली हाती पडलेले सोने (Gold) घेऊन पलायन केले. त्यामुळे अब्दुल आहाद यांनी २ मे रोजी रात्री वसमत शहर पोलिस(City Police) ठाण्यात धाव घेऊन रितसर तक्रार दिल्याने स. अनवर स. खैसर, इरशत बेगम स. अनवर रा. नांदेड, असलम, इम्रान रा. निझामबाद, संगिता कातोरे ता. वसमत या पाच जणावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासचक्र फिरवून सय्यद अनवर याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.