हिंगोली (Hingoli Accident) : तालुक्यातील रामा देऊळगाव फाट्यावर टिप्परवर मोटारसायकल आदळून (Hingoli Accident) गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा नांदेड रुग्णालयात नेत असताना गुरूवारी रात्री मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, देऊळगाव रामा येथील परमेश्वर सुभाना दिपके (५२) वर्षे हे १९ सप्टेंबर रोजी सवड येथील एका व्यक्तीला सोडण्याकरीता मोटारसायकल वरुन गेले होते.
सवड येथून परत येत असताना रात्री ८ च्या सुमारास रामा देऊळगाव फाट्यावर एक टिप्पर उभे होते. याच वेळी परमेश्वर सुभाना दिपके (५२) यांच्या चेहऱ्यावर समोरून येणाऱ्या मोटारसायकला उजेड पडल्याने त्यांची मोटारसायकल क्रमांक एमएच २८ बीबी १७४१ यावर आदळल्याने (Hingoli Accident) ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्ण्वाहीकेव्दारे हिंगोली येथील रुग्णालयात आणले. त्यांच्यावर प्रथोमपचार करून नांदेड रुग्णालयात नेत असताना आ. बाळापूर नजीक रात्री ११ वाजता त्यांचा मृत्यू झाला. घटनेबाबत नर्सी नामदेव पोलिसात गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.