मयत परभणीतील धार रोडवरील रहिवाशी
परभणी (Parbhani Accident) : शहरातील धार रोडवरील समद प्लॉटिंग येथे राहणार्या ३० वर्षीय युवकाचा मंगळवार ९ जुलै रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास भानखेडा पाटी ता. सेनगाव जि. हिंगोली येथे (Hingoli Accident) अपघाती मृत्यू झाला. या अपघातात इतर दोघेजण जखमी झाले आहेत. सदर प्रकरणी आरोपी क्रुझर जीप चालकावर गुन्ह्याची नोंद (Parbhani Crime) करण्यात आली आहे.
रेहान खान यांनी तक्रार दिली आहे. फरहान खान आय्युब खान, असे मयताचे नाव आहे. फरहान खान व त्याच्या सोबत शेख जावेद शेख तुराब, रोहित बबन गरुड हे दुचाकीने सेनगावकडून परभणीकडे येत असताना भानखेडा पाटीजवळ समोरुन येणार्या एम.एच. ३८. ७९१६ या क्रमांकाच्या क्रुझर जीपने जोराची धडक दिली. या (Hingoli Accident) अपघातात फरहान खान गंभीर जखमी होऊन मयत झाले. तर इतर दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी (Sengaon Police) सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.