परभणी जिल्ह्यातील आसोला शिवारामध्ये घडला अपघात
हिंगोली/परभणी (Hingoli Accident) : परभणी- वसमत रोडवरील असोला शिवारातील डॉ.नावंदर फार्म हाऊस जवळ ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात (Hingoli Accident) औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथील आई-वडिलांसह मुलगा हे तीन जण जागीच ठार झाल्याची घटना रविवार १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास घडली आहे.
सविस्तर माहिती अशी की औंढा तालुक्यातील अंजनवाडी येथील कुटुंब परभणी येथून परभणी- वसमत रस्त्यावरून दुचाकी क्रमांक एम.एच.३८-ए.सी.८३७१ सदरील क्रमांकाची दुचाकी परभणी येथून परभणी वसमत रोड मार्गे झिरो फाटा कडे जात होती. परभणी वसमत रोडवरील असोला शिवारातील डॉ नावंदर फार्म हाऊस जवळ झिरो फाटा मार्गे परभणी कडे जात असलेल्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन या (Hingoli Accident) अपघातात दुचाकीवरील एकनाथ बाबाराव घुगे (३६), शुभांगी एकनाथ घुगे (३४), समर्थ एकनाथ घुगे (११) हे तीन जण जागीच ठार झाले. परभणी- वसमत रोडवरील प्रवास करणार्या प्रवाशी वर्ग व शेतकरी वर्ग यांनी सदरील घटनेची माहिती पोलिसांना दिली.
घटनास्थळी ताडकळस पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, पोलिस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे अपाराव वराडे, रामकीशन काळे नवा मोढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मरे ,सपोनी करकुडे मॅडम, पी एस आय नाटकर,टाकरस ,पोना विजय मुरकुटे, अनिल भराडे व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली पोलिस प्रशासन मदत करण्यासाठी पोलिस पाटील पंढरीनाथ रिक्षे, बाळासाहेब जावळे, ग्रा.पं.सदस्य अरुण डहाळे यांनी मदत केली. घटनेबाबत ताडकळस पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान एकनाथ घुगे हे रिसोड आगारामध्ये वाहक पदावर कार्यरत होते. मनमिळावू स्वभावाच्या एकनाथचा अपघातात पत्नी व मुलासह मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडल्याने अंजनवाडी गावावर शोककळा पसरली. मयत एकनाथ शिंदे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय असा परीवार आहे. एकनाथचा भाऊ नवनाथ घुगे हे सुद्धा हिंगोली आगारामध्ये वाहक पदावर कार्यरत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. परभणी-वसमत रस्त्यावर आसोला शिवारात ट्रॅक्टर व मोटारसायकलचा रविवारी अपघात झाला. ज्यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथील एकनाथ घुगे, शुभांगी घुगे व समर्थ घुगे या (Hingoli Accident) तिघांचा जागीच मृत्यू झाला.