डोंगरकडा/हिंगोली (Hingoli Accident) : आज सकाळी ७:३० च्या दरम्यान नांदेडहुन दारव्हा या बसला मागून येणार्या ट्रकने जबर धडक (Hingoli Accident) दिली. बस कंडक्टरच्या चार फासळ्या आणि सावरगाव येथील जोगदंड या व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर होऊन, १३ जण किरकोळ जखमी झाले. तेथून कुणीतरी वारंगा फाटा येथे २४ तास सेवा देणार्या जगतगुरु नरेंद्र महाराज संस्थान च्या रूग्णवाहिकाचे (Free Ambulance) चालक अक्षय सूर्यवंशी यांना फोन केला. त्यांनी त्या सर्व जखमींना डोंगरकडा येथील (Hingoli hospital) प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता तेथे नेहमीप्रमाणे निवासी डॉक्टर व नर्स आढळून आल्या आहेत.
माहितीनुसार, आज नांदेड -दारव्हा ही बस क्र- एम.एच.४०,वाय-५२८४ ही वारंगा फाटा येथून हदगाव कडे जात असतांना कुर्तडी शिवारातील सरस्वती फार्मसी कॉलेजच्या समोर थांबली असता पाठीमागून येणार्या ट्रकने धडक दिली. बसमधील तेरा ते चवदा जण किरकोळ जखमी झाले. दोन जण गंभीर जखमी झाले ही घटना ३० में रोजी सकाळी ७:३० च्या दरम्यान घडली. सदरील घटना ही (Hingoli Accident) हदगाव ते वारंगा फाटा या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट रस्त्याचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाल्याने गुणनियंत्र विभागाने त्यांना जेवढे निकृष्ठ काम झालेले आहे. मोठं मोठया भेगा पडलेल्या आहेत त्या संपूर्ण तोडून काढायला लावल्याने आपसूकच त्या कामामुळे ये-जा करणारी वाहतूक ही काही ठिकाणी एकतर्फी करण्यात आल्याने हा अपघात झाला असावा, असे बोलल्या जात आहे.
तेवढ्या पहाटे पहाटे जगतगुरु नरेंद महाराज संस्थान नानिज धाम ह्यांच्या ट्रस्टने वारंगा फाटा येथे निशुल्क रूग्णवाहिका (Free Ambulance) उपलब्ध करून दिल्याने राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक- १६१ व ३६१ वरील अपघात ग्रस्तांना मोठा आधार मिळाला आहे. झालेल्या (Hingoli Accident) अपघातातील जखमींना नांदेड जवळ असल्याने डोंगरकडा येथील सरकारी दवाखान्यात घेऊन आल्याने तेथील दवाखान्यात राहणार्या निवासी कर्मचार्यांना पाण्याची सोय नसल्या कारणामुळे दवाखाण्याचे दोन्ही डॉक्टर हे नांदेडहून कारभार पाहतात. त्यामुळे तेथील कार्यरत असलेल्या नर्स ह्यांच्यावर रूग्णाला पाहणे किरकोळ जखमी असल्या तर प्रथोमोपचार करणे त्यात मलम पट्टी आली. हा अतिरिक्त लोड आल्याने त्या सुद्धा चिडचिड करतांना दिसून येतात. महामार्गावरील जखमींना कोणी घेऊन दवाखान्यात आले. लगेच त्यांना नांदेकडे रेफर करण्यात आपली धन्यता मानतात. थोडीफार चिडचिड केल्यानंतर त्याच नंतर मलम पट्टी करतात हे विशेष.
बस मधील जखमींची नावे पुढीलप्रमाणे राजेश शेखर राठोड, शालू नामदेव राठोड, सुनीता किसन खंदारे, गोदावरी रामा खंदारे, व्यंकटी इंगळे,किसन मिरासे, केशव मिरासे, पांडुरंग गोटाने, सीताराम गिरी, शेख मझर, शेख अन्सार, शिला कदम हे आहेत. झालेल्या (Hingoli Accident) अपघातात कंडक्टर च्या छातीच्या चार फासळ्या आणि सावरगाव येथील जोगदंड यांचा पाय फॅक्चर झाल्याने त्यांना नांदेड कडे हलवण्यात आले आहे.