हिंगोली ते कळमनुरी खटकाळी बायपास रस्त्यावर गतिरोधकानजीक अपघात
हिंगोली (Hingoli Accident) : हिंगोली ते कळमनुरी खटकाळी बायपासवर रविवारी सकाळच्या सुमारास भरधाव ट्रक चालकाने एकास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात हिंगोली ग्रामीण पोलिसात (Hingoli Police) ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
हिंगोली ग्रामीण पोलिसात ट्रक चालकावर गुन्हा दाखल
हिंगोली राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १२ मधील शिलाबाई भिकाजी अवसरमोल ह्या कर्मचारी असून त्यांचा मुलगा बाळू भिकाजी अवसरमोल (३२) हा २८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता हिंगोली ते कळमनुरी रस्ता खटकाळी बायपासवरून जात असताना गतिरोधकावर ट्रक क्रमांक जी.सी.०७-जी.जे.५८११ च्या चालकाने आपले वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून बाळू अवसरमोल यास जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले. (Hingoli Accident) यामध्येच त्याचा मृत्यू झाल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात आशा अवसरमोल यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे ह्या करीत आहेत.