हिंगोली ग्रामीण पोलिसात ट्रक चालकावर गुन्हा दाखल
हिंगोली (Hingoli Accident) : हिंगोली ते औंढा नागनाथ डिग्रस फाट्याजवळ रविवारी रात्रीच्या सुमारास भरधाव ट्रकच्या धडकेत दोनजण ठार झाले असून एकजण गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. (Hingoli Accident) अपघाताबाबत हिंगोली ग्रामीण पोलिसात (Hingoli police) गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील संतुक प्रिंपी येथील शेख हबीब शेख मदार (२५), गौसखाँ साहेबखाँ पठाण (२६), शेख इरफान शेख जिलानी हे तीन तरूण डिग्रस फाट्याजवळ रस्त्यालगत मोटार सायकल उभी करून ४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास उभे असताना ट्रक क्रमांक एम.एच.४०- वाय.४४७७ च्या चालकाने त्यांना धडक दिल्यानंतर अपघात स्थळावरून ट्रक चालकाने पलायन केले. या (Hingoli Accident) अपघातात शेख हबीब शेख मदार याचा जागेवरच मृत्यू झाला तर शेख इरफान शेख जिलानी गौसखाँ साहेबखाँ पठाण हे दोघे जखमी झाले होते.
या अपघाताची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही गंभीर जखमींना हिंगोलीतील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरीता नांदेडला हलविण्यात येत होते. या दोन्ही जखमींना नांदेडला नेत असताना गौसखाँ पठाण याचा मृत्यू झाला. शेख इरफान याच्यावर नांदेड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या (Hingoli Accident) घटनेबाबत हिंगोली ग्रामीण पोलिसात ५ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास शेख खाजा शेख मदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास (Hingoli police) पोलिस उपनिरीक्षक युवराज गवळी हे करीत आहेत.
या (Hingoli Accident) अपतामधील मयत शेख हबीब शेख मदार याच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तर गौसखाँ साहेबखाँ पठाण याच्या पश्चात आई वडील, पत्नी, तीन मुली असा परीवार आहे. हे दोघेही घरातील कर्ते-धर्ते पुरूष होते. दोघांचाही अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.