आखाडा बाळापूर/हिंगोली (Hingoli Accident) : आज रात्री सात वाजण्याच्या सुमारास महामार्गावर लाकडे घेऊन जाणाऱ्या (Hingoli Accident) ट्रकचे टायर फुटून ट्रक पलटी झाला यानंतर ट्रक केबिनला आग लागली.आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले. शुक्रवारी रात्री लाकडे घेऊन जाणाऱ्या ट्रकचे महामार्गावर पिंपरी शिवारात टायर कुठल्यानंतर ट्रक पल्टी होउन केबिनला आग लागली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.
घटनास्थळी आखाडा बाळापूर पोलिस स्थानकाचे (Hingoli City Police) सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, रामदास ग्यादलवाड, शिवाजी पवार, राजीव जाधव, अरविंद जाधव, वामन हिरवे व महामार्ग पोलीस सोपान थिटे, कोंडकर, ढाले, राठोड व इतरांनी धाव घेतली अपघात दोघे तिघेजण जखमी झाले. रात्री पावनेआठ वाजता अग्निशामक दलाची गाडी येऊन आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आले. (Hingoli Accident) अपघातानंतर ट्रकने पेट घेऊन मोठी आग लागल्याने दोन्ही बाजूंनी वाहन मोठ्या प्रमाणावर जमा झाली होती. अपघातग्रस्त वाहन हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस, (Hingoli City Police) महामार्ग पोलिस पथक धावपळ करत होते.