कळमनुरी (Hingoli) :- कळमनुरी तालुक्यातील धानोरा (जं) येथे मिरवणुकीत धक्का लागल्याचा राग मनात धरून मिरवणूक संपल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन लोखंडी रॉडने मारहाण (beating) केल्या गेली. या दोन युवक जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात (Hospital)हलविण्यात आले आहे. दरम्यान गावात तणाव वाढू नये यासाठी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आरोपीचा शोध घेत चार आरोपीला ताब्यात घेतले आहे.
दोन युवक गंभीर जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक; चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
याबाबत अधिक माहिती अशी की कळमनुरी तालुक्यातील धानोरा (जं) येथे दि.२३ फेब्रुवारी रोजी शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये सर्व समाजाचे नागरिक सहभागी झाले असता या मिरवणुकीत धक्का लागला असल्याचा राग मना धरून प्रणव हरण व माधव हरण यांच्यासह कळमनुरी येथील आठ ते दहा जणांनी मिरवणूक संपल्यानंतर फिर्यादीच्या घरासमोर येऊन जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी रॉडने डोक्यावर व पाठीवर वार करून प्रवीण पाईकराव व नागसेन डोंगरे यांना गंभीर जखमी केले. यानंतर जखमींना तात्काळ कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता जखमी युवकावर प्रथमऔषधोपचार करण्यात आले. परंतु यात एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नांदेड येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची फिर्याद प्रफुल यांनी कळमनुरी पोलीस स्टेशनला दिल्यानंतर प्रणव हरण माधव हरण यांच्यासह आठ ते दहा जनाविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,पोलीस पोलीस उपविभागीय अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे आदींनी भेट देऊन शांततेचे आवाहन केले आहे.