हिंगोली(Hingoli):- कृषी उत्पन्न बाजार समितीमधील(Agricultural Produce Market Committee) उपसभापतीसह अन्य दोन संचालक अपात्र ठरले आहेत. त्यानंतर बाजार समितीची आज शुक्रवारी पहिलीच बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाजार समितीची आज शुक्रवारी पहिलीच बैठक
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ संचालकांची सदस्य संख्या आहे. ज्यामध्ये उपसभापती अशोक श्रिरामे, संचालक शामराव जगताप, माधव कोरडे या तिघांचे संचालक पद जिल्हा उपनिबंधकांनी अपात्र ठरविले आहे. त्यामुळे सध्या सभागृहात पंधरा संचालक कार्यरत आहेत. या तीन संचालकांच्या अपात्रेनंतर आता आज ११ ऑक्टोंबर शुक्रवारी बाजार समितीची पहिली सभा सकाळी १०.३० वाजता बाजार समितीच्या शेतकरी निवासात घेण्यात येणार आहे. या सभेमध्ये एप्रिल ते सप्टेंबर २०२४ च्या खर्चास मान्यता देणे, बाजार समितीच्या अपेक्षित खर्चांना मान्यता देणे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट येथील शेड क्रमांक १ मध्ये दोन्ही ओट्यामधील गॅप भरून समतल करणे, कृषी उत्पन्न बाजार समिती ग्रेन मार्केटयेथील शेड क्रमांक २ ची भिंत पडली आहे. तसेच शेड क्रमांक ३ चे गेट तुटून पडले आहे. त्यामुळे याची दुरूस्ती करणे यासह सभापतींच्या उपस्थितीने आहे त्यावेळी येणार्या इतर विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
या सभेला संचालकांनी उपस्थित राहण्या बाबत बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी नोटीस दिली आहे. तीन संचालक अपात्रतेनंतर आजची होणारी ही पहिली बैठक असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.