आखाडा बाळापूर/हिंगोली (Akhada Balapur Police) : आखाडा बाळापूर पोलीसांच्या (Akhada Balapur Police) दक्षतेमुळे सोमवारी रात्री चोरीच्या मोठ्या घटना टळल्या चोरट्यांनी चार ठीकाणी गेटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतल्याने चोरटे अंधारात पसार झाले. माहितीनुसार, सोमवारी रात्री बारा ते दोन दरम्यान आखाडा बाळापूर माधवनगर भागात चोरटे आले आसल्याची कुणकुण लागल्याने नागरिकांनी पोलिसांना फोन केला. (Akhada Balapur Police) पोलीस पथक बसस्थानक भागात गस्तीवर होते व जिल्हा गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, राजीव जाधव, शिवाजी पवार, सरकटे व चालक राजेश मुलगीर यांनी घटनास्थळी धाव घेतली चार ठिकाणी चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला एका ठिकाणी घरावर चढत असताना पोलीस आल्याचा सुगावा लागताच चोरटे अंधारात शेताने पसार झाले. यापूर्वी या भागात चोरीच्या घटना झालेल्या आहेत.
आजारी माणसाची तब्येत कशी आहे?
या भागातील एकाची तब्येत खराब आसल्याने घरी कोणी नव्हते रात्री चोरट्यांनी गेट तोडून आत प्रवेश केला शेजारच्या वयोवृद्ध महिलेस वाटले शेजारी आले काय की म्हणून तब्येत विचारू लागली, पुढून काही प्रतीसाद आला नसल्याने महिलेच्या मुलास शंका येउन त्यांनी (Akhada Balapur Police) पोलिसांना माहिती दिली यामुळे पोलीस लवकर घटनास्थळी धावले यामुळे याभागातील चोरीच्या घटना टळल्या.