हिंगोली (Hingoli Andolan) : शेतकर्यांची कर्जमाफी, पीकविमा, सोयाबीन, कापूस दरवाढ मिळावी यासाठी शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांचे सिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन (Andolan) सुरू असून त्यांची तब्येत बिघडल्याने हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या निमित्ताने ७ सप्टेंबर शनिवार रोजी नांदेड-वाशिम राष्ट्रीय महामार्ग कनेरगाव नाका येथे टायर जाळल्याने बराच वेळ (Traffic disruption) वाहतूक विस्कळीत झाली होती.
शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांचे चार दिवसापासून जिजाऊ माता यांचे जन्मस्थान सिंदखेड राजा या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन (Food abandonment Andolan) चालू असून त्याचा चौथा दिवस आहे. त्यांची तब्येत बिघडल्याने जिल्ह्यातील शेतकर्यांनी कनेरगाव नाका या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळल्याने पोलिसांची चांगलीच धांदल उडाली होती. ८ सप्टेंबर रोजी रास्तारोको आंदोलनाची ठिणगी पडणार आहे. त्यामुळे हे आंदोलन आणखीच चिघळणार आहे.
पोलिसांनी आंदोलनातील चौघांना घेतले ताब्यात
रस्त्यावर टायर जाळल्याने (Traffic disruption) गजानन प्रकाश गावंडे, सखाराम पांडूरंग ठाकरे, नामदेव लक्ष्मण पतंगे, चंद्रकांत नारायण सावळे या चौघांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक संदीप जमादार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शालीग्राम अंभोरे, पोलिस अंमलदार गजानन कर्हाळे, चंद्रशेखर काशिदे, बालाजी मारवाडी हे उपस्थित होते.