हिंगोली (Hingoli Andolan) : राज्यातील अंशता तथा विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी (Teachers Andolan) आजपर्यंत 300 च्या वर आंदोलन करूनही त्यांना हक्काचा शंभर टक्के पगार मिळत नसल्यानेराज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालय व शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय समन्वयक संघाच्या वतीने घेण्यात आला. त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील शिक्षकांनी आज दिनांक 19 जुलै रोजी हिंगोली जिल्हाधिकारी शिक्षण अधिकारी यांना निवेदन देऊन 22जुलैपासून बेमुदत लाक्षणिक धरणे आंदोलन (Teachers Andolan) करण्याचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना 1 जानेवारी 2024 पासून विना अट प्रतिवर्षी वाढीव टप्पा लागू करणे.
माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी 9 नोव्हेंबर 2023 रोजी आझाद मैदानावर येऊन दिलेला शब्द पाळणे 12 जुलै 2024 रोजी शिक्षण मंत्री यांची टप्पा वाढ अनुदानावर केलेली घोषणा याबरोबरच राज्यातील पुण्यस्तरावरील घोषित घोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करणे 30 जुलै 2024 पर्यंतचा टप्पा वाढसह आणि मागण्यातील शासन आदेश निर्गम करून आचारसंहितापूर्वी किमान एक महिन्याचा वाढीव टप्पा पगार (Teachers Andolan) शिक्षकांच्या खात्यात जमा करून याचा शासन आदेश निर्गमित करणे जोपर्यंत ह्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 ते 4ः 00 या वेळात लाक्षणिक धरणे आंदोलन चालू राहील शासन निर्णय घेत नसल्यास राज्यभरातील ही सर्व आंदोलने एक ऑगस्ट 2024 पासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करणार आहेत ती वेळ शासनाने येऊ देऊ नये तत्पूर्वीच वेतन अनुदानाचा वाढीव टप्प्याचा व प्रतिवर्षी नैसर्गिक टप्पा वाढ चा शासन आदेश निर्गमित करून शिक्षकांना न्याय द्यावा, अशा प्रकारचे निवेदन (Hingoli Andolan) हिंगोली जिल्ह्याच्या शिक्षक समन्वय संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी हिंगोली जिल्ह्यातील हजारो शिक्षक समन्वयक उपस्थित होते.